जळगाव : शहरात चोरीच्या घटना काही दिवस कमी झाल्या होत्या. मात्र चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. आव्हाणे शिवारातील जुनी पोलीस लाईन परिसरात असलेल्या सुदत्त कॉलनीत गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी तीन घर फोडले आहे. यावेळी चोरट्यांनी घरांमधून हजारोंची रोकड व बँकेचे कागदपत्र चोरून नेले असून याप्रकरणी घरमालकांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे़शुक्रवारी पहाटे ५ वाजता चोरीचा प्रकार उघड झाल्यानंतर तालुका पोलिसांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली़ यावेळी चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केल्याचे दिसून आले़ तर कपाट फोडून सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आले़गच्चीवर झोपलेले असताना डल्लाआव्हाणे शिवारातील सुदत्त कॉलनी येथे नाना उर्फ प्रकाश काशीनाथ चौधरी हे पत्नी व मुलांसोबत राहतात़ खाजगी कंपनीत काम करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात़ गेल्या दोन दिवसांपासून उकाडा जास्त जाणवत असल्यामुळे चौधरी कुटुंबीय गच्चीवर झोपत होते़ गुरुवारी जेवण झाल्यानंतर घराला कुलूप लावून चौधरी कुटुंबीय गच्चीवर झोपण्यासाठी गेले़ दरम्यान, मध्यरात्री चोरट्यांनी घराला कुलूप असल्याचे संधी साधत कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला व रोकड व एटीएम तसेच बँकेचे कागदपत्र चोरून नेले़शेतीचे काम पाहण्यास गेले असताना घरात चोरीविनोद शांताराम पाटील हे पत्नी व मुलासह सुदत्त कॉलनीत राहतात़ शेती करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात़ मुलाला सुट्टी असल्यामुळे मूळगावी लाडली येथे शेतीतील काम सुरळीत सुरू आहे की नाही, हे पाहण्यासाठी ते कुटुंबीयांसोबत गुरुवारी गेले होते़ त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते़ दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री प्रकाश चौधरी यांच्या डल्ला मारल्यानंतर चोरट्यांनी विनोद पाटील यांच्या घराचे कुलूप तोडून घरातून चार ते पाच हजार रुपयांची रोकड लंपास केली़ पहाटे प्रकाश चौधरी यांना त्यांच्या घरात चोरी झाल्यानंतर विनोद पाटील यांच्या घरातही चोरी झाल्याचे कळताच त्यांनी त्वरित पाटील यांना संपर्क साधला़ नंतर पाटील यांनी त्वरित घराकडे धाव घेतले़ घरात पाहणी केली असता त्यांना रोकड चोरीला गेल्याचे दिसून आले़ तर घरातील सामानही अस्तावस्त फेकलेले होते़प्रकाश चौधरी व विनोद पाटील यांच्याकडे चोरी केलेल्यानंतर चोरट्यांनी बाजूलाच असलेले कुलूप बंद घरही फोडले़ दरम्यान, घरात काहीही आढळून आले नाही़ दरम्यान, हे घर पोलीस कर्मचारी प्रकाश कोळी यांचे असल्याची माहिती परिसरातील रहिवाश्यांनी दिली़पोलिसात घेतली धावएकाच रात्री तीन घर फोडल्यामुळे शुक्रवारी सकाळी घरमालकांनी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत घटनेची माहिती दिली़ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली़ मात्र, चोरट्यांचा सुगावा मिळेल असे काहीही आढळून आले नाही़ याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द तक्रार दाखल करण्यात आली आहे़पहाटे ५ वाजता उघड झाला प्रकारशुक्रवारी सकाळी कंपनीत ड्युटीला जायचे असल्यामुळे प्रकाश चौधरी यांना पहाटे ५ वाजता जाग आली़ गच्चीवर खाली उतरल्यावर त्यांच्या पत्नीस घराचा दरवाजा उघडा व आत लाईट लागलेले दिसून आले़ घरात प्रवेश करताना साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले आढळून आले तर सात ते आठ हजार रुपयांची रोकड तसेच एटीएम, बँकेचे कागदपत्र लंपास झाल्याचे दिसून आले़ तर तुटलेला कडी-कोयंडा व कुलूप दरवाज्याजवळ आढळून आले़ दरम्यान, घराजवळीलच आणखी दोन घर चोरट्यांनी फोडल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी जवळच राहत असलेले विनोद पाटील यांना त्यांच्या घरात चोरी झाल्याचे कळविले़
एकाच रात्री फोडले तीन घर हजारोंचा ऐवज लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 12:26 PM