धरणगाव : बैलपोळा सणानिमित्त शेतकरी व सर्जा राजा सन्मान सोहळा २०२१ अतिशय उत्साहात झाला. विकल्प ऑर्गनायझेशनतर्फे या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
शहरात बैलपोळा सणाचे औचित्य साधून विकल्प ऑर्गनायझेशन या स्वयंसेवी संस्थेतर्फे आयोजित शेतकरी व सर्जा राजा सन्मान सोहळा २०२१ अतिशय थाटामाटात झाला. बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बैलांना खापर वरील पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालण्यात आला. तसेच बैलजोडीचे मालकांना बागायतदार रुमाल, टोपी, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कृतज्ञता सोहळ्यात ३०० जोडी बैल आणि ३०० शेतकऱ्यांना सन्मानित करून बळीराजा व सर्जा राजा यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
अतिथी मान्यवरांमध्ये श्रीजी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीचे संचालक नयन चिमणलाल गुजराथी, जीवनसिंह कडुसिंह बयस, माजी नगराध्यक्ष सुरेश सीताराम चौधरी यांच्या हस्ते शेतकऱ्यांना व सर्जा राजाला सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेसचे नेते डी. जी. पाटील उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी एपीआय गणेश अहिरे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ चौधरी, पांडुरंग मराठे, मोहन पाटील, पत्रकार आर. डी. महाजन, पूनमचंद बाविस्कर, चंदन पाटील, डॉ. धीरज पाटील, नाना महाराज, नामदेव मराठे, प्रफुल्ल पवार, परशुराम पाटील, राजू पाटील, गोकूळ पाटील, दादू पाटील, हिम्मत महाजन, नितीन मराठे, गोलू भाचा, गणेश पाटील, संदीप गायकवाड, किरण अग्निहोत्री, गजानन साठे, इ. मान्यवर तसेच विकल्प ऑर्गनायझेशनचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विकल्प ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष प्रा. रवीद्र शिवलाल मराठे, सचिव नरेंद्र सुभाष पाटील, उपाध्यक्ष अमोल सखाराम महाजन, सहसचिव गणेश चुडामण चौधरी, कोषाध्यक्ष योगेश निंबाशेठ सोनार, कार्यक्रम समन्वयक लक्ष्मण प्रभाकर पाटील आदींनी परिश्रम घेतले.
फोटो कॅप्शन: बैलजोडी व मालकाचा सत्कार करताना डॉ. धीरज पाटील सोबत जीवनशेठ बयस, नयनशेठ गुजराती, विकल्प संस्थेचे लक्ष्मण पाटील, नरेंद्र पाटील, अमोल पाटील, निंबा सोनार.
छाया: आर डी महाजन ११/२