या जोडीचा ५ वर्षांचा शिपाई ते कृषी सहाय्यक पदावर वृक्ष सेवेसह कार्यालय कामाचा प्रवास. अन ३०० हिरव्यागार झाडांचा सहवास. असे निसर्गरम्य चित्र येथे दिसते. या दोघा कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांचे कौतुक वृक्षप्रेमी मंडळीतून होत आहे. याबाबत माहिती अशी की, भडगाव तालुका कृषी कार्यालय भडगाव शहरापासून दीड कि. मी. अंतरावर चाळीसगाव रस्त्यावर आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालय भडगाव येथे ४ ते ५ वर्षांपूर्वीची परिस्थिती म्हणजे रखरखत्या उन्हात उजाड वातावरणात कार्यालय होते. तालुक्यातील परिसरातून शेतकरी उन्हातून आल्यानंतर क्षणभर विश्रांती किंवा गाडी लावण्यासाठी एकही झाड नव्हते. परंतु सद्यस्थितीत कार्यालय परिसर अत्यंत निसर्गरम्य दिसत असून, परिसराचा कायापालट करण्यासाठी कार्यालयाचे कर्मचारी सुखदेव गिरी व सचिन पाटील यांनी मोलाची कामगिरी केली आहे. कार्यालयीन परिसरात स्वखर्चातून झाडे उभी केली. कार्यालयीन परिसरात पंचायत समितीच्या सभापती अर्चना पाटील यांचे हस्ते सदस्या असतांना ४ वर्षांपूर्वी वृक्षारोपण केले होते. तद्नंतर पंचायत समिती गटविकास अधिकारी, प्रांत अधिकारी राजेंद्र कचरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, उपविभागीय कृषी अधिकारी नंदकिशोर नाईनवाड यांच्या हस्तेही वृक्षारोपण करण्यात आले. तसेच तालुका कृषी अधिकारी गोरडे यांनी परिसरातून अनेक वृक्ष रोपे गोळा करून कार्यालयातील कर्मचारी सचिन पाटील व सुखदेव गिरी यांना वृक्षलागवडीबाबत नेहमीच प्रेरणा दिली. वृक्ष लागवडीनंतर बालकाप्रमाणे वृक्षांचे संगोपन करण्याचे काम या कर्मचाऱ्यांनी केले.
----
भडगाव तालुका कृषी कार्यालयात वृक्षांना पाणी टाकतांना सुखदेव गिरी व सचिन पाटील ही जोडी. सोबत तालुका कृषी अधिकारी बी. बी. गोरडे.
---
फोटो