शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

तीन वेगवेगळ््या अपघातात तिघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:30 AM

तीन जण जखमी

जळगाव : जिल्ह्यात तीन वेगवेगळ््या ठिकाणी झालेल्या अपघातात तीन जण ठार तर तीन जण जखमी झाला.चोपडा येथे शहराच्या गावाबाहेरील धरणगाव चौफुलीवर गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास निमगव्हाणकडे बर्फ घेऊन जाणाऱ्या रिक्षाला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॉलाने (क्रमांक सी.जी.०४ जे डी ३८९५) जोरदार धडक दिली. यात जोरदार आवाज होऊन मालवाहू रिक्षा रस्ताच्या कडेला फेकली जाऊन रिक्षात बसलेला मजूर भूपेंद्रसिंग लेखराम बाथम (१८) हा तरुण जागीच ठार झाला. त्याच्या सोबत गाडीत बसलेला पंकज अजयपाल कश्यप हा तरुण गंभीर जखमी झाला आहे तर अन्य दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर ट्रॉला चालकाने शिरपूरकडे पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी पाठलाग करून शिरपूर बायपास रोडवर पकडून चालकास ताब्यात घेतले. या प्रकरणी मालवाहू रिक्षाचालक जगदीश कोळी यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला ट्राला चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रदीप राजपूत करीत आहेत.वाहनातून फेकले गेल्याने चोपड्याचा तरुण ठारचोपडा- वैजापूर रस्त्यावर तेल्या घाटात वळणावर खासगी प्रवासी वाहतूक करणाºया चारचाकी वाहनातून (एम.एच.१५, के.३००८) फेकल्या गेल्याने चालकाच्या मागे बसलेला चोपडा येथील साने गुरुजी वसाहतीतील रहिवासी पिंटू चिंतामन भोई (३८) हे ठार झाले. वैजापूर येथून मासेमारी व्यवसाय करून पिंटू भोई हे परत येत असताना हा अपघात घडला. जखमी अवस्थेत पिंटू भोई यांना चोपडा येथे खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना जळगाव येथे नेण्याचा सल्ला दिला. तेथे उपचार सुरु असताना पिंटू भोई यांचा मृत्यू झाला. सुनील सीताराम भोई यांच्या फिर्यादीवरून चालक संतोष शंकर पाटील विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सासरी आलेला तरुण अपघातात ठारचाळीसगाव - मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात बंडू बाबुलाल गायकवाड (वय ३३, रा.पातोंडा ता.चाळीसगाव) हा मजूर जागीच ठार झाला. हा अपघात १४ रोजी पहाटे ५.३० वाजता धुळे रोडवरील हनुमान मंदिरासमोर घडली. मयत बंडू हा चाळीसगाव येथील आनंदवाडीत सासरवाडीला मुक्कामी आला होता. घटना घडताच वाहन चालकाने वाहन सोडून पळ काढला. वाल्मीक गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन चालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक आशिष रोही तपास करीत आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव