जळगाव : दुचाकीस्वाराचे लक्ष विचलीत करून त्याच्या डिक्कीतून तीन लाख रुपये लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी जळगावातील अग्रवाल हॉस्पिटल चौकात घडली.प्राथमिक माहितीनुसार, दुचाकीच्या डिक्कीमध्ये तीन रुपये घेऊन दुचाकीस्वार जात असताना त्यास अज्ञाताने तुमची काहीतरी वस्तू पडली असल्याचे सांगितले. त्या वेळी दुचाकीस्वार वाहन लावून वस्तू पाहण्यास गेला व त्या क्षणी डिक्कीतून अज्ञाताने तीन लाख रुपये घेऊन पोबारा केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.दरम्यान, शहरातील स्टेट बँक चौकनजीकच एका शिक्षण संस्थाचालकाची अशाच प्रकारे बॅग लाबंविण्यात आली होती. या घटनेचा तपास लागलेला नसताना पुन्हा ही घटना घडल्याने शहरात भीतीचे वातावरण आहे.