जळगाव : एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी दुपारी एमआयडीसीत मोबाईल चोरणाºया तीन मुलांना पकडले. त्यातील दोन जण अल्पवयीन असून त्यांच्याजवळ ६५ हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल आढळून आले. या तिघांनी हे मोबाईल बुधवारी पिंप्राळा बाजारातून चोरले होते. सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, इम्रान सय्यद, मुदस्सर काझी व असीम तडवी यांच्या पथकाने या तिघांना पकडले. विशाल आनंदा शिंदे (१९) रा. वरदाळा, ता.मेहकर, जि.बुलडाणा याला अटक करण्यात आली आहे.दरम्यान, सायंकाळी पंचनामा केल्यानंतर तिघांना रामानंद नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. शालीग्राम प्रेमराज जाधव (रा. आर. एल. कॉलनी), भिमराव पांडूरंग महाले (रा.दादावाडी), विश्वनाथ रामचंद्र भदाणे (साई नगर), एकनाथ सुखदेव पाटील, हिंमत आत्माराम काळे (रा. जलाराम नगर), सोहनलाल गणेशराम मेश्राम (रा. वाटीकाश्रमजवळ) व चैतन्य लालसिंग पाटील यांचे मोबाईल बाजारात चोरी झाले होते. े
मोबाईल चोरणाऱ्या तीन जणांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 12:32 PM