आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२६ : शिकारीच्या प्रयत्नात असलेल्या तीन शिकाºयांना वढोदा वनविभागाच्या अधिकाºयांनी शनिवारी अटक केली़ त्यांच्याजवळून ३९ जिवंत गावठी बॉम्ब, दोन धारदार सुरे आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.जनार्दन गजनसिंग भोसले, सोना गुलाब पवार (दोघे रा.हलखेडा) व माणिक देवराम बेलदार (रा.डोलारखेडा) असे या अटक केलेल्यांची नावे आहेत. वाघाचा अधिवास असल्यामुळे अतिशय संवेदनशील असलेल्या डोलारखेडा जंगलात शनिवारी काही शिकारी फिरत असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण, वनपाल पी.पी. शेनुळे, फणसे, वनरक्षक डी.जी.पवार, धुळगंडे, तडवी आदींसह वनमजूर यांनी तत्काळ वनक्षेत्राची पाहणी केली असता जनार्दन भोसले, सोना पवार व माणिक बेलदार हे तीन जण शिकारीच्या प्रयत्नात आढळले. त्यांची झडती घेतली असता ३९ जिवंत गावठी बॉम्बचे गोळे व दोन सुरे आढळून आलेत. त्यांना मुक्ताईनगर न्यायालयासमोर हजर केले असता २८ पर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली.
मुक्ताईनगर जंगलात वनअधिका-यांनी केली तीन शिका-यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 2:53 PM
वन विभागाच्या अधिका-यांनी संशयितांकडून ३९ जिवंत गावठी बॉम्ब व धारदार सुरे केले जप्त
ठळक मुद्देवाघाचा अधिवास असल्यामुळे डोलारखेडा अतिशय संवेदनशीलसंशयितांना मुक्ताईनगर न्यायालयाने सुनावली २८ पर्यंत वनकोठडीसंशयितांकडून ३९ जिवंत गावठी बॉम्ब, दोन धारदार सुरे आणि एक मोटारसायकल जप्त