जामनेर : शहरासह तालुक्यातील सर्वच लहान-मोठे सरकारी खासगी दवाखाने रुग्णांच्या गर्दीने फुल्ल झालेले आहेत. एकेका पलंगावर दोन -दोन व तीन-तीन रुग्णांची व्यवस्था करावी लागत असल्याचे चित्र दिसत असून डॉक्टरसुद्धा हैराण झाले आहेत. दरम्यान पावसाळ्याच्या दिवसात दूषित पाण्याच्या दुष्परिणाम म्हणूनही विषाणूजन्य आजारात भरमसाठ वाढ होते, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.ताप, खोकला,सर्दीने रुग्ण हैराणशहरासह तालुक्यातील लहान-मोठ्या सर्वच खासगी व सरकारी दवाखान्यात लहान बालकांसह प्रौढांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसू लागली आहे.यामध्ये रुग्णांना ताप, खोकला, सर्दी असे आजार अधिक असून रुग्णांचे हात पाय दुखणे, स्नायू ताणले जाणे यामुळे ते चांगलेच हैराण झालेले आहेत.रोज ५०० वर रुग्णांची तपासणीशहरातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दररोज पाचशे ते सहाशे रुग्णांची तपासणी करण्यात येऊन औषधोपचार केला जात आहे. तसेच प्रथामिक आरोग्य केंद्रामध्येही व खेडोपाडी असलेल्या दवाखान्यांमध्येही जिकडे-तिकडे रुग्णांची गर्दी दिसून येत आहे.रुग्णांची गर्दी,डॉक्टरांची तारांबळ!येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये सध्या ५० पंलगांची व्यवस्था असली तरी वाढती संख्या पाहता प्रत्येक पलंगावर सध्या दोन ते तीन रुग्णांची व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र प्रत्येकाला सलाईन, इतर औषधी पुरवताना दवाखान्यातील डॉक्टर तसेच परिचारिकांची सध्या चांगलीच तारांबळ उडताना दिसते.अतिरिक्त ५० बेडला मंजुरीजामनेर उपजिल्हा रुग्णालयात सध्या असलेले ५० बेड वाढत्या रुग्णसंखेमुळे कमी पडत असल्याने अतिरिक्त ५० बेडला मंजुरी मिळाली आहे. आरोग्य विभागाने तातडीने याकडे लक्ष देऊन कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
एकेका पलंगावर तीन-तीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 3:29 PM