भुसावळ,दि.3- राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील परमीटरूम व वाईन शॉपी बंद झाल्यानंतर रविवारी संध्याकाळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 46 वरील तीन ढाब्यांवर कारवाई करीत हॉटेल मालकांना अटक केली आहे. कारवाईत सुमारे 25 हजारांचा बेकायदा मद्य साठा जप्त केला आहे.
तीन ढाब्यांवर धडक कारवाई
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 46 वरील हॉटेल हनी हे विक्की उर्फ भागचंद रमेश बत्रा यांच्या हॉटेलमधून बिअरसह विदेशी मिळून सहा हजार 400 रुपयांचे मद्य जप्त करण्यात आल़े
दुसरी कारवाई हॉटेल खालसा पंजाबमध्ये करण्यात आली़ तेथून तीन हजार 780 रुपयांचे देशीसह बिअर जप्त करण्यात आली़ तिसरी कारवाई अशपाक हिरा गवळी यांच्या चाहेल पंजाब ढाब्यावर करण्यात आली़ हा हॉटेलवरून 25 हजार 80 रुपयांचे देशी-विदेशी दारू जप्त केली़ सर्वाधिक मद्य येथे पोलिसांना मिळून आल़े
कारवाईत यांचा सहभाग
सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह साहाय्यक फौजदार दिलीप कोळी, प्रदीप पाटील, संकेत झांबरे, विशाल सपकाळे, सुनील शिंदे, राजेश काळे, शेख रियाज आदींच्या पथकाने ही कारवाई केली़
महामार्गावरील तीन ढाबे चालकांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हे दाखल
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 46 वरील तीन ढाब्यांवर सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्वत: आधी दुचाकीवर जावून धडक कारवाई केली़ साध्या वेशात अधिकारी आल्यानंतर मद्यपी व हॉटेल्स चालकांना साधी भनकही न लागल्याने मोठय़ा प्रमाणावर मद्यसाठा पकडण्यात यश आल़े पहिल्या कारवाईत विक्की उर्फ भागचंद रमेश बत्रा यांच्या हॉटेल हनीमधून सहा हजार 400 रुपये किंमतीची विदेशी दारू तसेच बिअर जप्त करण्यात आल्या़ दुसरी कारवाई अशपाक हिरा गवळी यांच्या चाहेल पंजाब ढाब्यावर करण्यात आली़ तेथून सर्वाधिक 25 हजार 80 रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली तसेच हॉटेल खालसा पंजाबचे सुनील पंचमसिंग राजपूत यांच्याकडून तीन हजार 780 रुपयांचे विदेशी मद्य तसेच बिअर जप्त करण्यात आल्या़
बाजारपेठ पोलिसांना कारवाईपासून ठेवले अलिप्त
या कारवाईची बाजारपेठ पोलिसांना साधी भनकही लागू देण्यात आली नाही़ अत्यंत गुप्त रितीने त्यांनी पथकाला सूचना देत कारवाई केली़ कारवाई झाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांच्या पथकाला कळवण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे व बाजारपेठच्या डीबी कर्मचारी ढाब्यांवर पोहोचल़े
महामार्गावरील ढाब्यांवर बेकायदा मद्य प्राशन करणा:या तळीरामांना बाजारपेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आल्यानंतर नीलोत्पल यांनी मद्यपींची चांगलीच ङिांग उतरवली़ यापुढे उघडय़ावर दारू पिण्यास बसणार नाही, असे वदवून घेतल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजत़े