जळगाव : बनोटी ता. सोयगावनजीक असलेल्या धारकुंड धबधब्यात तीन तरुण बुडाल्याने सोबतचे मित्र हबकले आहेत. धबधब्यात खाली दगडांच्या कपाऱ्यात हे तरुण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रात्र झाल्याने शोध कार्य थांबविण्यात आले आहे. यात बुडालेला राहूल हा एकुलता मुलगा आहे.राहूल रमेश चौधरी (२३, रा.हनुमान नगर, अयोध्या नगर, ) व राकेश रमेश भालेराव (२५,रा.सुप्रीम कॉलनी) आणि गणेश भिकन सोनवणे (२३, रा. जारगाव ता. पाचोरा) तीन तरुण या धबधब्याच्या पाण्यात बुडाल्याची घटना रविवारी दुपारी साडे चार वाजता घडली.रविवारी सुटी व श्रावण महिन्याच्या निमित्ताने शहरातील अयोध्या नगर परिसरातील राहूल चौधरी, राकेश भालेराव, राकेश नथ्थू चौधरी, काकासाहेब पांडूरंग लोंढे, विक्की व सचिन असे ६ तरुण चारचाकी वाहनाने पाटणादेवी व बनोटी येथील धारकुंड धबधब्यावर फिरायला गेले होते. दुपारी साडे चार वाजता धबधब्याच्या पाण्यात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने राहूल व राकेश हे दोघं जण पाण्यात बुडाले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मित्रांनी त्यांचा शोध घेतला. गावात माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी धाव घेतली. पाण्याची पातळी खोल असल्याने रात्री उशिरापर्यंतही शोध कार्य सुरु होते. दरम्यान, सोबत गेलेल्या मित्रांना बनोटी पोलीस दूरक्षेत्रात चौकशीकामी आणण्यात आले होते. सहायक फौजदार झाल्टे, सतीश पाटील व पवार या पोलीस कर्मचाºयांनी रात्री उशिरापर्यंत मदत कार्य केले.जारगावचाही तरुण बुडालाया धबधब्याजवळ फिरण्यासाठी पाचोरा येथील तीन तरुणही गेलेले होते. जळगाव शहरातील दोन तरुणांसोबतच जारगाव, ता.पाचोरा येथील गणेश भिकन सोनवणे हा तरुण बुडाला. पोलीस याबाबत चौकशी करीत होते. सोबतचे सर्व मित्र घाबरलेले असल्याने बुडालेल्या तरुणांची नावेही त्यांना सांगता येत नव्हती. धारकुंड धबधब्याजवळ महादेवाचे मंदिर असून तेथूनच हिवरा नदीचा उगम आहे. तीनशे फूट उंच धबधबा आहे. श्रावण महिन्यात येथील सौंदर्य बहरलेले असल्याने पर्यटक व भाविकांची मोठी गर्दी होते. धबधब्यात खाली दगडांच्या कपाºयात हे तरुण अडकल्याची शक्यता गावकºयांकडून व्यक्त केली जात होती.राहूल एकुलता मुलगाराहूल हा आई, वडीलांचा एकुलता मुलगा होता. तो फर्निचर दुकानात कामाला होता तर वडील रमेश धमन चौधरी हे वॉचमनचे काम करतात तर आई सरला खासगी रुग्णालयात काम करते. या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीत अत्यंत हलाखीचे आहे. राहूल हा कर्ता व एकुलता मुलगा असल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. राकेश भालेराव हा पूर्वी अयोध्या नगरातील शांती निकेतन भागात वास्तव्याला होता. आता काही दिवसापूर्वीच सुप्रीम कॉलनीत वास्तव्याला गेल्याची माहिती मिळाली.सायंकाळी सुरु झाली शोधाशोध४मनमोहक धबधबा आणि नैसर्गिक सौंदर्यात सर्व जण मनसोक्त आनंद घेत होते तब्बल दोन तास झाल्यानंतर घराकडे निघण्याच्या तयारीत असतांना एकमेकांची चौकशीत तीन जणाचा थांगपत्ता मिळत नसल्याने तेथील तलावात तेथे जमलेले पर्यटक आणि सहा मित्रांनी शोधाशोध करुनही मिळाले नाहीत.-अंधार पडत असल्याने मित्र परिवारातील विष्णू बारी, समाधान बारी, राजेश चौधरी, काकासाहेब लोंढे, अजिंक्य सोळके आणि निलेश अहीरे यांनी बनोटी दुरक्षेत्र गाठून सर्व घटनाक्रम सांगितल्यावर बनोटी दुरक्षेत्राचे ठाणे अंमलदार सुभाष पवार, सतीश पाटील, दीपक पाटील, विकास दुबीले यांनी घटनास्थळी धाव घेत शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र जंगलातील काळोख आणि रात्रीची वेळ असल्याने त्यांना परतावे लागले. सकाळी परत शोध कार्य करण्यात येणार आहेत.
धबधब्यात तीन जण बुडाले... बाकीचे तंतरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 12:22 PM