आॅनलाईन लोकमतजळगाव दि,३१ : जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या नातेवाईकांच्या भेटीसाठी आलेल्या तिघांना दुचाकीवरुन आलेल्या १० ते १५ जणांच्या टोळक्याने लाथाबुक्यांनी व फायटरने बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी साडे तीन वाजता जिल्हा रुग्णालय आवारात घडली. यात सुलेमान खान अब्दुल खान (वय २३), गुड्डू काकर सलीम (वय २५) व सलमान शेख मेहबुब काकर (वय १९) तिन्ही रा.तांबापुरा, जळगाव) हे जखमी झाले आहेत. हल्ल्याचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तमीजाबी शेख रहेमान ही महिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असल्याने सुलेमान, सलमान व गुड्डू हे तिन्ही जण रविवारी दुपारी साडे तीन वाजता रिक्षाने जिल्हा रुग्णालयात आले. रिक्षातून उतरताच दुचाकीवरुन आलेल्या दहा ते पंधरा जणांनी या तिघांवर हल्ला चढविला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालय आवारात पळापळ झाली.डॉक्टरलाही धक्काबुक्कीफायटरने मारहाण झाल्यामुळे तिन्ही तरुणांच्या डोक्याला व तोंडाला जबर मार लागला. रक्तबंबाळ अवस्थेत हे तिन्ही तरुण आपत्कालिन विभागात गेले. तेथील वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रवीण बोदडे यांनाही मारहाणकर्त्यांनी धक्काबुक्की केली. आपण डॉक्टर आहोत, तुमची पोलिसांकडे तक्रार करतो असा दम भरल्यानंतर मारहाण करणा-यांनी तेथून पळ काढला. दरम्यान, डॉक्टरला मारहाण कोणी केली याबाबतडॉ.बोदडे यांना विचारले असता जखमीचे नातेवाईक होते की त्यांना मारहाण करणारे होते याबाबत ठामपणे सांगता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवीगाळ करणाºयामध्ये एका जणाचे आडनाव सोनवणे होते असे डॉ.बोदडे म्हणाले.
रुग्णालयात तणावाची स्थितीतीन तरुणांना फायटरने मारहाण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर जखमी गटाच्या लोकांची मोठी गर्दी जिल्हा रुग्णालयात झाली होती. दरम्यान, तणावसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त व दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले होते. पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे, परिविक्षाधीन उपअधीक्षक धनंजय पाटील, जिल्हा पेठच निरीक्षक सुनील गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींकडून माहिती जाणून घेतली. पोलिसांचा ताफा दाखल झाल्यानंतर गर्दीवर नियंत्रण आले.