जामनेर : बोदवड-जामनेर रस्त्यावर झालेल्या अपघातात दोन मोटारसायकली एकमेकांवर आदळल्याने तीन जण ठार, तर दोन जण जखमी झाले. मयतांपैकी दोन जण हे तालुक्यातील टाकळी येथील काका-पुतणे आहेत. हा अपघात वाडीकिल्ला गावाजवळ गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडला. टाकळी येथील एकाच कुटुंबातील अजरुन रामदास माळी (32), प्रल्हाद श्यामू माळी (60) व मंजुळा प्रल्हाद माळी (55) हे तीन जण मलकापूरजवळील बहादरपूर येथे सकाळी लगAाला गेले होते. परत येत असताना त्यांच्या मोटारसायकलला (एमएच-19-सीएन-9476) समोरून येणा:या मोटारसायकलने जोरदार धडक दिली. जामनेर येथून बोदवडकडे जात असलेल्या मोटारसायकलवर (एमएच-28/यु-7599) किसन चिमा शिंदे (रा.नांदगाव, जि.नाशिक) व जगदेव वासुदेव किटे (वय 38), रा.कोल्हाडी, ता.बोदवड हे तीन जण होते. यातील अजरुन माळी, किसन शिंदे (वय 35) हे दोघे जागीच ठार झाले, तर प्रल्हाद माळी हे जळगावला उपचारासाठी जात असताना रस्त्यातच मरण पावले. मंजुळा माळी व जगदेव किटे या दोघा जखमींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्यांना जळगावी सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.अपघातातील मयत किसन शिंदे यांच्या मेंढय़ाचा कळप आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नजीर शेख, उपनिरीक्षक विशाल पाटील हे रुग्णवाहिका व पोलिसांसह घटनास्थळी निघाले.पोलीस कर्मचारी, रुग्णवाहिकाचालक जालमसिंग, रवींद्र झाल्टे व शोएब सौदागर यांनी मृत व जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात आणले. डॉ.जयश्री पाटील व डॉ.आर.के. पाटील यांनी जखमींवर प्राथमिक उपचार केले. रुग्णालयात मयताच्या नातेवाईकांसह नागरिकांनी गर्दी केली होती.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आज दुपारी शहरात असल्याने अपघाताचे वृत्त कळताच त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.अपघाताची भीषणता एवढी होती की, दोन्ही मोटारसायकल चक्काचूर झाल्या होत्या. अपघातामुळे या रस्त्यावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. मृतदेह व जखमी रस्त्यावरच पडून होते. पोलीस व रुग्णवाहिका पोहोचल्यानंतर मृतदेह हलविण्यात आले.
दोन दुचाकींची धडक तीन ठार, दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2017 12:31 AM