शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

चार हजाराची लाच घेतांना तीन पोलिसांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 9:00 PM

पत्त्यांचा क्लब सुरु ठेवण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेणाऱ्या फैजपूर ता. यावल येथील तीन पोलिसांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

फैजपूर, जि. जळगाव :

पत्त्यांचा क्लब सुरु ठेवण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेणाऱ्या फैजपूर ता. यावल येथील तीन पोलिसांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. फैजपूर येथे शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली. 

हेमंत वसंत सांगळे (५२, रा. भारत एंटरप्रायजेस मागे, फैजपूर),  किरण अनिल चाटे, (४४, रा. विद्या नगर, फैजपूर) आणि महेश ईश्वर वंजारी (३८ रा.लक्ष्मी नगर, फैजपूर) अशी या लाचखोर पोलिसांची नावे आहेत. 

यातील तक्रारदार यांचा बामणोदला पत्त्यांचा क्लब आहे.  या क्लबवर कारवाई होऊ नये, यासाठी संबंधित बीट हवालदार सांगळे व चाटे यांनी चार हजार रुपये लाचेची मागणी केली. यातील एक हजाराची रक्कम वंजारी यांनी घेतली.  ही रक्कम घेताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तीनही जणांना अटक केली.

विभागाचे पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, सहायक फौजदार सुरेश पाटील, हे.कॉ.अशोक अहिरे, सुनिल पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, जनार्दन चौधरी, .किशोर महाजन, सुनिल वानखेडे, बाळु मराठे, प्रदीप पोळ, सचिन चाटे, अमोल सुर्यवंशी, प्रणेश ठाकूर यांच्या पथकाने ही कारवाई केली.