जळगाव : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींसोबत प्रौढाला मारहाण केल्याच्या प्रकरणात अटक केलेला हवालदार मुकेश आनंदा पाटील, सुरेश श्रीराम सपकाळे व कॉ.गोरख हिंमतराव पाटील या तिघांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती खुद्द पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी ‘लोकमत’ ला दिली. पोलीस कोठडीचा हक्क राखून न्यायालयाने रविवारी तिघांची कारागृहात रवानगी केली. मुकेश याचा गुन्ह्यात सक्रीय सहभाग होता तर सुरेश सपकाळे व गोरख पाटील हे चिंग्याला सोडून घरी निघून गेले. कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका दोघांवर ठेवण्यात आला. दरम्यान, या तिनही निलंबित कर्मचाºयांना मुख्यालय पोलीस मुख्यालय देण्यात आले आहे.खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या चिंग्या उर्फ चेतन आळंदे याला या पोलिसांनी न्यायालयातून थेट कारागृहात न नेता त्याच्यासोबत खासगी कारने तुकारामवाडीत नेले होते. तेथे चिंग्याने अरुण भिमराव गोसावी यांना मारहाण करुन कारमध्ये डांबून ठेवले होते. या प्रकरणी चेतन आळंदे, गोलु उर्फ लखन दिलीप मराठे, हवालदार मुकेश पाटील, सुरेश सपकाळे व कॉ. गोरख पाटील यांच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.गुन्ह्यात कलम वाढविलेदरम्यान, या गुन्ह्यात आणखी ३६४ हे खून करण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याचे कलम वाढविण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी दिली.मद्यपी पोलिसाला सक्तीची सेवानिवृत्तीपोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या अशोक पटवारी या कर्मचाºयाला सोमवारी सक्तीने सेवानिवृत्त करण्यात आले. याबाबत पोलीस अधीक्षकांनी सायंकाळी आदेश जारी केले. यापूर्वी या कर्मचाºयाची विभागीय चौकशी सुरु होती. ड्युटीवर असताना सतत मद्यप्राशन करण्याच्या कारणावरुन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला मदत करणारे तिनही पोलीस निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 8:44 PM
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींसोबत प्रौढाला मारहाण केल्याच्या प्रकरणात अटक केलेला हवालदार मुकेश आनंदा पाटील, सुरेश श्रीराम सपकाळे व कॉ.गोरख हिंमतराव पाटील या तिघांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती खुद्द पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी ‘लोकमत’ ला दिली. पोलीस कोठडीचा हक्क राखून न्यायालयाने रविवारी तिघांची कारागृहात रवानगी केली.
ठळक मुद्देचिंग्याचे मारहाण प्रकरण गुन्ह्यात वाढीव कलम लावले