आॅनलाईन लोकमतजळगाव दि,११ : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच पैकी तीन चोरट्यांना पाठलाग करुन पकडण्यात आले असून दोन जण मात्र फरार होण्यात यशस्वी झाले.रावेर गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रावेर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. शेख नादर शेख कादर, शेख मुस्तफा शेख बिसमिल्ला व आकाश रामदास भालेराव (तिन्ही रा.रावेर) असे अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी हेडकॉन्स्टेबल रवींद्र गायकवाड, रमेश चौधरी, योगेश पाटील, गफूर तडवी व इद्रीस पठाण यांच्या पथकाला मंगळवारी रात्री रावेर तालुक्यातील विशेष तपासणी मोहीमेत पाठविले होते. रावेर पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेली पाच जणांची टोळी मध्यरात्री न्यायालय परिसरातील एक बगंल्यात दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना ही माहिती देऊन स्थानिक पोलिसांची मदत मागितली. कुराडे यांनी रावेरचे निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्याशी संपर्क साधून टोळीला पकडण्यासाठी पोलीस स्टेशनचे कर्मचारी पाठविण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार पिंगळे यांनी गजेंद्र पाटील, सुरेश मेंढे व जाकीर पिंजारी या तिघांना मदतीला दिले. तिघं वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्दपारअटकेतील शेख नादर, शेख मुस्तफा व आकाश भालेराव अशा तिघांवर रावेर पोलीस स्टेशनला चोरी, दरोडा, लुटमार, दरोड्याचा प्रयत्न अशा प्रकारचे तब्बल आठ गुन्हे दाखल आहेत. तसेच ६ आॅक्टोबर २०१७ रोजी पोलीस अधीक्षकांनी या तिघांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केलेले आहे. जिल्ह्यात प्रवेश बंदी असतानाही त्यांच्याकडून दरोड्या प्रयत्न झाला. दरम्यान,दरोड्याचा प्रयत्न, पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन, हद्दपार कालावधीत जिल्ह्यात प्रवेश या तीन प्रकारे तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगाव जिल्ह्यात दरोडा टाकण्यापूर्वीच तिघांना केले जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 4:24 PM
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच पैकी तीन चोरट्यांना पाठलाग करुन पकडण्यात आले असून दोन जण मात्र फरार होण्यात यशस्वी झाले.रावेर गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रावेर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. शेख नादर शेख कादर, शेख मुस्तफा शेख बिसमिल्ला व आकाश रामदास भालेराव (तिन्ही रा.रावेर) असे अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.
ठळक मुद्दे दोन जण फरार होण्यात यशस्वी एलसीबीची मध्यरात्री रावेरात कारवाईतिघं आरोपी वर्षभरासाठी हद्दपार