जळगाव : गणेश कॉलनीत रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुडगूस घातला.युनीटी चेंबर्समधील साई पानसेंटर फोडून सिगारेट व काही रोकड लांबविल्यात आली तर तर पाच हजार रुपये सुरक्षित राहिले.अन्य दोन दुकानांचे शटर वाकविण्यात आले, मात्र तेथे प्रयत्न फसला. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. युनीटी चेंबरमध्ये मनीष राजेंद्र वाणी रा.रथचौक यांच्या मालकाची साई पान शॉप नावाने पान सेंटर आहे. त्यांच्या शेजारी वर्धमान स्नॅक्स व हेरंभ इंटरप्रायजेस अशी दुकाने आहेत. सोमवारी सकाळी ७ वाजता मनीष वाणी यांना त्यांच्या मित्रांचा फोन आला. त्याने पानसेंटरचे शटर अर्धे उघडे असून चोरीचा प्रकार झाल्याचे सांगितले. त्यानुसार वाणी यांनी धाव घेतली असता टॉमीच्या सहाय्याने शटर वाकवून चोरट्यांनी ड्रावरमधील तीन हजारांची रोकड, तर सात हजारांच्या सिगारेटचा माल लांबविला असल्याचे लक्षात आले. दुसºया ड्रावरमध्ये हिशोब नोंदवहीमध्ये पाच हजाराची रोकड होती, याकडे चोरट्यांचे लक्ष न गेल्याने ती रोकड सुरक्षित राहिली.
पानसेंटरच्या शेजारी निलेश पृथ्वीराज चोपडा (रा. गणेश कॉलनी) यांचे वर्धमान स्नॅक्स नावाचे दुकान आहे. वाणी यांचे दुकान फोडल्याची माहिती मिळाल्यावर चोपडाही दुकानावर आले. त्यांनी पाहणी केली असता, शटर टॉमीच्या सहाय्याने प्रयत्न झाला होता. तर दुकानाबाहेरील लाईड फोडलेला होता. चोरट्यांनी लाईट फोडून पानसेंटरमध्ये चोरी केल्याची शक्यता आहे. सात लाखाचे तांब्याचे रॉड सुरक्षितपान सेंटरच्या दुस-या बाजूला जयेश रजनीकांत कुलकर्णी रा.श्रीकृष्ण कॉलनी यांचे हेरंभ इंटरप्रायजेस म्हणून एसी विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे. यांच्याही दुकानाचे शटर वाकवून चोरीचा प्रयत्न झाल्याचे समोर आले. दरम्यान हेरंभ इंटरप्रायजेसमध्ये एसी साठी लागणारे लाखो रुपयांचे तांब्याचे रॉड होते. दुकान फुटले असत लाखो रुपयांचे रॉड चोरीला गेले असते, मात्र सुदैवाने शटर न वाकूनही सेंटर लॉक असल्याने ते उघडले नाही व रॉड सुरक्षित राहिंले.