जळगाव : जोशीपेठेतील शिवनेरी नावाच्या इमारतीमध्ये गुणवंतराव राजाराम शिंदे (६५, रा़जोशीपेठ) हा घरात बेकायदेशीर रित्या तीन तलवारी बाळगताना सहाय्यक पोलीस अधीक्षक निलाभ डॉ़ रोहन यांच्या पथकाला गुरूवारी दुपारी आढळून आला़ याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात शिंदे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़रथचौक परिसरातील जोशी पेठेतील शिवनेरी इमारतीमध्ये वास्तव्यास असलेला गुणवंतराव शिंदे हा घरात तलवारी बाळगून असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ़ निलाभ रोहन यांना मिळाली होती़त्यांनी त्वरित पोलीस उपनिरिक्षक मनोहर जाधव, सुनील पाटील, किरण धनके, अनिल पाटील, सचिन साळुंखे, महेश पवार अशांचे पथक तयार करून जोशीपेठेत जाऊन कारवाई करण्याचे आदेश केले़ नंतर या पथकाने शनिपेठ पोलिसांच्या मदतीने गुरूवारी दुपारी १ वाजता शिवनेरी इमारतीमधील गुणवंतराव शिंदे यांचे घर गाठले़घराची झडती घेतल्यानंतर पथकाला कापडामध्ये तीन तलवारी गुंडाळलेल्या आढळून आल्या़ पोलिसांच्या पथकाने तलवारी जप्त करित गुणवंतराव यास अटक केली़ त्यानंतर शनिपेठ पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र मोतीराया यांच्या फिर्यादीवरून गुणवंतराव शिंदे याच्याविरूध्द बेकायदेशीररित्या तलवारी बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
जोशीपेठेत एका घरात सापडल्या तीन तलवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 11:54 AM