रावेर, जि.जळगाव : तालुक्यातील अवैध गौणखनिज वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने रात्री गस्त घालत २४ तासात अवैध वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर जप्त केले. तहसील कार्यालयात एक तर निंभोरा व सावदा पोलीस स्टेशनला एकेक ट्रॅक्टर स्थानबद्ध करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. दरम्यान, सव्वा लाख रुपये किमान दंडाची आकारणी पाहता ३ लाख ७५ हजार रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.रावेर तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी महसूल विभागाने रात्री गस्त घालण्याची मोहीम राबविली आहे. मंगळवारी रात्रीच्या गस्तीत उटखेडा रोडवरील अवैध वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.दरम्यान, विवरे बुद्रूक येथील शाळेजवळ अवैध वाहतूक करणारे दुसरे ट्रॅक्टर जप्त करून निंभोरा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. नायब तहसीलदार सी.जे.पवार, रावेर मंडळाधिकारी सचिन पाटील, तलाठी ईश्वर कोळी व शैलेश झोटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.दरम्यान, या घटनेला २४ तास लोटत नाही तोच निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, खिरोदा मंडळाधिकारी संदीप जयस्वाल, सावखेडा तलाठी अजय महाजन, चिनावल तलाठी उमेश बाभुळकर निंभोरा तलाठी समीर तडवी, विवरे तलाठी तेजस पाटील यांच्या पथकाने सावदा येथे बुधवारी रात्री साडे आठला अवैध वाळू वाहतूक करताना आढळून आल्याने, त्यास सावदा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.मंगळवारी रात्री पारशा नाल्याच्या वरील बाजूस असलेल्या जागृत हनुमान मंदिरासमोरील शेतात अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर सोडून चालक पसार झाल्याची घटना घडली.
रावेरला २४ तासांत अवैध वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 12:04 AM
अवैध गौणखनिज वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने रात्री गस्त घालत २४ तासात अवैध वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर जप्त केले. तहसील कार्यालयात एक तर निंभोरा व सावदा पोलीस स्टेशनला एकेक ट्रॅक्टर स्थानबद्ध करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
ठळक मुद्देएक तहसील कार्यालयात तर निंभोरा व सावदा पोलिसात दोन ट्रॅक्टर जमापावणेचार लाख रू दंड