लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, यातील दोन मृत्यू हे खासगी रुग्णालयात झाले आहेत. दरम्यान, कोरोनाचे नवे २३ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे फुले मार्केटमध्ये मंगळवारपासून पुन्हा व्यापारी, कामगारांची तपासणी मोहीम सुरू होणार आहे.
जिल्ह्यातील चाळीसगाव येथील ६३ वर्षीय पुरूष, भुसावळ तालुक्यातील ७० वर्षीय पुरूष आणि रावेर तालुक्यातील ७२ वर्षीय पुरूष यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांची संख्या १,३२३वर पोहोचली आहे. दरम्यान, सोमवारी आरटीपीसीआर चाचण्या घटल्याचे चित्र होते. केवळ ६५ अहवाल संकलित करण्यात आले आहेत. तर २४० अहवालांमध्ये केवळ दोघे बाधित आढळले आहेत. १,१५० अॅंटिजेन तपासण्या झाल्या आहेत. जळगाव शहरात पाच बाधित रुग्ण आढळले असून, शिवाजीनगरमध्येही एक रुग्ण आढळला आहे.