मच्छीवाडा भागात दोन गटांत छेडखानीच्या कारणावरून दोन गट भिडल्यानंतर जखमींना गोदावरीत हलवण्यात आले व जखमींना भेटण्यासाठी अफाक पटेल व अदनान शेख तेथे गेल्यानंतर गोपनीय बातमीदाराला संशयितांच्या कमरेला कट्टा असल्याची माहिती मिळाली. आरोपी रुग्णालयाबाहेर पडताना त्याचवेळी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे हे तेथे पोहोचल्यानंतर संशयित थबकले व त्यांनी तेथून काढता पाय घेतला. वाघचौरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही बाब लक्षात आली व संशयितांनीदेखील पोलीस आपल्याला केव्हाही अटक करतील म्हणून त्यांनी आपल्याकडील कट्टा वकील खान ऊर्फ गोल्डी शकील खानकडे दिला. दोघा संशयितांना आधी ताब्यात घेऊन बोलते करताच त्यांनी गोल्डीकडे कट्टा दिल्याची कबुली देताच आरोपीच्या पंधरा बंगला परिसरातील जलाल शहा दर्गा परिसरातून शनिवार, २९ रोजी सायंकाळी ६.४५ वाजता ताब्यात घेण्यात आले व १५ हजार रुपये किमतीचा कट्टा जप्त करण्यात आला. कॉन्स्टेबल विकास सातदिवे यांच्या फिर्यादीवरून तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
तिघा आरोपींच्या जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत, जळगाव स्थानिक गुन्हे शाखा जळगाव निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे नाईक रवींद्र बि-हाडे, नाईक उमाकांत पाटील, परेश बि-हाडे, प्रशांत परदेशी, जीवन कापडे व जळगाव गुन्हे शोध पथकातील शरीफ काझी, युनूस शेख रसुल, किशोर राठोड, विनोद पाटील, रणजित जाधव आदींच्या पथकाने आवळल्या. अधिक तपास सहायक निरीक्षक कृष्णा भगवान भोये करीत आहे. पोलीस प्रशासन कोरोनाकाळामध्ये अलर्ट असून प्रत्येक विषयावर बारकाईने करडी नजर ठेवली जात आहे. गुन्हेगारीचा संपूर्ण बीमोड करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी वेगवेगळ्या पथकांची नियुक्ती केली आहे.