शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

रत्नापिंप्रीसह परिसरातील तीन गावांना भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 6:38 PM

पारोळा तालुक्यातील रत्नापिंप्री, दबापिंप्री आणि होळपिंप्री या तीन गावात ऐन हिवाळ्यातही भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

ठळक मुद्देतिन्ही गावांची ग्रामपंचायत एकच असून तिचे प्रयत्न अपुरे पडत आहेत महिलांची दररोजची पायपीट, शाळा बुडवून मुले पाण्याच्या शोधातउन्हाळ्यात काय होणार, याची ग्रामस्थांना सतावतेय चिंता

आॅनलाईन लोकमतरत्नापिंप्री ता. पारोळा, दि.५ : उन्हाळ्याला अद्याप तीन महिने बाकी असतांनाच रत्नापिंप्रीसह दबापिंप्री, होळपिंप्री गावात गेल्या महिनाभरापासून तीव्र पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अबालवृद्ध पाण्यासाठी वणवण भटकत असून महिलांना तर दररोजची पायपीट नशिबी आली आहे. एवढेच काय पाण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनाही शाळा बुडवून रानोमाळ भटकावे लागत आहे. पाणी समस्येवर मात करण्यासाठी गृप ग्रामपंचायतीचे प्रयत्न असले तरी ग्रामस्थांना बसणारी झळ कायम आहे.रत्नापिंप्रीसह दबापिंप्री, होळपिंप्री या तिन्ही गावासाठी गृप ग्रामपंचायत असून पाणी पुरवठ्यासाठी भोकरबारी धरणात दोन विहिरीची व्यवस्था करण्यात आली आहे, मात्र या विहिरीच्या पातळीतही कमालीची घट दिसून येत आहे. त्यामुळे या तिन्ही गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे कठीण जात आहे. गृप ग्रामपंचायतने धरणावरील विहिर खोदकाम सुरू केले असले तरीही गावाच्या पाणी पुरवठ्यासाठी हे प्रयत्न कमीच पडत आहे. ग्राम पंचायतीने सुरू ठेवलेले प्रयत्न असफलच होतांना दिसत आहेत .रत्नापिंप्री गृपग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्यासाठी भोकरबारी धरणात दोन विहिरी असून गावात दोन जलकुंभ तसेच नविन योजनाही देण्यात आली आहे. परंतु पाणीटंचाईची गंभीर समस्या न सुटल्याने वणवण भटकावे लागत आहे. गावातील सार्वजनिक विहिरींचेही खोलीकरण करणे गरजेचे आहे.सध्या इतर वापराच्या पाण्यासाठी व्यवस्था करणे देखील कठीण बनले आहे. रत्नापिंप्री, होळपिंप्री, दबापिंप्री या तिन्ही गावांचा पाणीपुरवठा आता गावातीलच सार्वजनिक ठिकाणी दोन नळांव्दारे करण्यात आला असला तरी मात्र येथून पिण्यापुरतेच पाणी उपलब्ध होत आहे. मात्र या व्यतिरिक्त गुरेढोरे यांच्या पिण्यासाठी पाणी तसेच घरगुती वापरासाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने जो तो आपआपल्या शेती परिसरात जाऊन पाण्यासाठी फिरतांना दिसत आहेत. 

टॅग्स :JalgaonजळगावParolaपारोळा