आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२९: ज्वेलर्समध्ये विक्रेत्यांचे लक्ष विचलित करुन दागिने लांबविणा-या सुपियाबी शेख मुसीब (वय ३६ ), नजमाबी शेख जावीद शेख (वय २६) दोन्ही रा.खडका, भुसावळ या दोन महिलांसह जावेद मुसा गराना (वय २७ रा.निंबायती मिठी खाडी, सुरत) या तिघांना शहर पोलिसांच्या पथकाने शनिवारी पकडले. चोरीचे दागिने ज्वेलर्समध्ये मोड करण्यासाठी ते शहरात आले होते, तत्पूर्वीच ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले.दरम्यान, या तिघांकडून १ लाख ५२ हजार ३१३ रुपये किमतीचे दागिने, चोरीचे १५ हजार रुपये व कार असा ३ लाख १८ हजार २०६ रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. गुजरात पासींग असलेली एक कार (क्र.जी.जे.२१ ए.एच.२६२३) शहरात आलेली असून दोन महिला व एक तरुण असे तिघं जण चोरलेले दागिने सराफ बाजारात मोडसाठी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी सहायक फौजदार वासुदेव सोनवणे, उल्हास चºहाटे, संगीता खांडरे, संजय हिवरकर, गणेश शिरसाळे, संजय भालेराव, सुधीर साळवे, मोहसीन बिराजदार, अक्रम शेख, इम्रान सय्यद, अमोल विसपुते व रतन गिते यांचे पथक तयार केले. या पथकाने सराफ बाजारात सापळा लावून दुपारी अडीच वाजता कार सह तिघांना ताब्यात घेतले.अनेक ठिकाणी चोरले सोनेपकडण्यात आलेल्या तिघांनी आतापर्यंत जळगाव जामोद, खामगाव, अकोला, शेगाव, बोदवड व अडावद येथील ज्वेलर्समधून लक्ष विचलित करुन दागिने लांबविले आहेत. त्याची कबुलीही त्यांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, लहान ज्वेलर्समध्ये चोरलेले दागिने जळगाव शहरात मोड केले जातात. या टोळीने अनेक ठिकाणी कारनामे केल्याची शक्यता आहे. जावेद हा सुरतचा रहिवाशी असून तो सुपियाबी व नजमाबी यांचा नातेवाईक आहे.आजीची पर्स लांबविल्याची कबुलीनातूच्या लग्नाची खरेदी करण्यासाठी आलेल्या सरलाबाई भगवान जळके (वय ५० रा.राधाकृष्ण नगर, जळगाव) या महिलेजवळील ३५ हजार रुपये रोकड असलेली पर्स फुले मार्केटमधून गेल्या आठवड्यात लांबविण्यात आली होती. तोंडाला रुमाल बांधलेली महिला सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाली होती. ती पर्स या दोन्ही महिलांनी लांबविल्याचे निष्पन्न झाले.
चोरलेले सोने जळगाव शहरात मोड करणा-यासाठी आलेल्या दोन महिलांसह तिघे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 11:43 AM
ज्वेलर्समध्ये विक्रेत्यांचे लक्ष विचलित करुन दागिने लांबविणाºया सुपियाबी शेख मुसीब (वय ३६ ), नजमाबी शेख जावीद शेख (वय २६) दोन्ही रा.खडका, भुसावळ या दोन महिलांसह जावेद मुसा गराना (वय २७ रा.निंबायती मिठी खाडी, सुरत) या तिघांना शहर पोलिसांच्या पथकाने शनिवारी पकडले. चोरीचे दागिने ज्वेलर्समध्ये मोड करण्यासाठी ते शहरात आले होते, तत्पूर्वीच ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
ठळक मुद्देदोन्ही महिला भुसावळच्या तर तरुण सुरतचापोलिसांनी लावला सराफ बाजारात सापळा कारसह साडे तीन लाखाचा ऐवज जप्त