पहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : पिस्तूलचा धाक दाखवून पेट्रोलपंपाचा भरणा असलेली सहा लाख ३० हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना येथील युनियन बँकेसमोर सोमवारी दुपारी तीनला घडली.प्र्राप्त माहितीनुसार, जळगाव-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर अजिंठा ट्रेडर्स हा पंप आहे. या पंपाच्या पैशांचा भरणा शनिवार व रविवार असा दोन दिवसांचा होता. पंपाचे कर्मचारी संजय पारखे व समाधान कुंभार हे सहा लाख ३० हजार घेऊन दुचाकीने युनियन बँकेजवळ जामनेर रोडवर पोहोचले. याठिकाणी जामनेरकडून तीन युवक दुचाकीवर आले. या युवकांनी काही न बोलता पंपाच्या कर्मचाºयांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या झटापटीत संजय पाखरे खाली पडल्याने किरकोळ जखमी झाला. इतर कर्मचाºयांनी लुटारूंचा प्रतिकार करताच दरोडेखोरांनी पिस्तूलचा धाक दाखवला व पैशाची बॅग हिसकावताना कर्मचाºयांच्या तोंडावर स्प्रे मारून जामनेरकडे पोबारा केला.जमाव येताच पिस्तूलमधून फायरिंगपंपाच्या कर्मचाºयांकडून लुटारू पैशाच्या बॅगेची ओढाताण करीत असतानाच बँकेजवळ असलेले नागरिक या ठिकाणी येताना दिसताच लुटाºयांनी पिस्तूल काढून फायरिंग केली. यामुळे नागरिक भयभित झाले. याचा फायदा उचलत त्यांनी पोबारा केला आहे. तरीही पंपाचे कर्मचारी संजय पाखरे त्यांच्या दुचाकीला मागे खेचत होते.जामनेरपर्यंत पाठलागघटनास्थळी ललित लोढा यांनी हा प्रकार पाहून त्यांचे सहकारी वासुदेव मिस्तरी, महेश बेदमुथा, विजय नाईक या चार जणांनी चारचाकीने जामनेर चौफुलीपर्यंत पाठलाग केला पण दरोडेखोर फरार होण्यात यशस्वी झाले. पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे, साहाय्यक फौजदार अनिल अहिरे, अनिल देवरे यांनी पिपळगाव गोलाईतपर्यंत शोध घेतला. तसेच सोनाळ्याचा जंगल पिंजून काढला. तरी अपयश आले.१५ मिनिटांचा थरारपाऊणेतीन वाजता घटनास्थळी दरोडेखोर दाखल झाले. सिनेस्टाईल दुचाकीचा आवाज करीत आजूबाजचे नागरिक हा थरार पाहत होते. ‘पहूर बंद’मुळे या परिसरात वर्दळ तुरळक प्रमाणात होती. याचाच फायदा दरोडेखोरांनी घेऊन अवघ्या १५ मिनिटात सहा लाख ३० हजार लुटण्याची हिंमत केली.पाळत ठेवून कामबँकेत पैसे भरण्याची वेळ दररोज दुपारी दोन -अडीच अशी होती. याची कल्पना अज्ञातांनी ठेवली असावी. नेहमीप्रमाणे पंपाचे दोन कर्मचारी दोन दिवसांचा भरणा घेऊन बँकेकडे निघाले. याची माहिती या युवकांना देण्यात आली आहे. त्यामुळेच लुटारे लूट करण्यात यशस्वी झाले असल्याचे सांगण्यात आले.जबरी चोरीचा गुन्हासंजय रामचंद्र पाखरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध भा.दं.वि. कलम ३९२, ३४ प्रमाणे पहूर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फायरिंग झाली असती तर घटनास्थळी पिस्तुलातील छऽऽरेऽऽ आढळले असते किंवा नळकांडी, गन पावडर जमिनीवर पडलेली असती. परंतु तसे काही दिसले नाही. त्यामुळे हा फायरिंगचा प्रकार वाटत नाही.-ईश्वर कातकाडे, पोलीस उपअधीक्षक, पाचोरा विभागबँकेसमोर आम्ही पैसे भरण्यासाठी आलो. समोरून दुचाकीवर तीन युवक आले. त्यांनी आमच्या गाडीला लाथ मारली. आम्हाला पिस्तूल दाखवून तोंडावर स्प्रे मारून मारहाण करून हातातील बॅग घेऊन पळून गेले. त्यांनी तोंडाला काळे रूमाल बांधलेले होते.-समाधान कुंभार, पहूर (घटनेतील प्रत्यक्षदर्शी)
पहूर येथे भरदिवसा पिस्तूल दाखवून सहा लाखांची रोकड तीन युवकांनी लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 8:50 PM
पिस्तूलचा धाक दाखवून पेट्रोलपंपाचा भरणा असलेली सहा लाख ३० हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना पहूर येथील युनियन बँकेसमोर सोमवारी दुपारी तीनला घडली.
ठळक मुद्देप्रतिकार करणाऱ्यांच्या तोंडावर लुटारूंनी मारला स्प्रेपेट्रोलपंप कर्मचारी व लुटारूंदरम्यान १५ मिनिटे चालला थरारपोलिसांसह पेट्रोलपंप कर्मचाºयांनी केला लुटारूंचा पाठलागलुटारू रकमेसह फरार होण्यात झाले यशस्वीपेट्रोलपंपाची रक्कम भरणा करताना ठेवली असावी पाळतजमाव येताच पिस्तूलमधून फायरिंग