जळगाव : शेतात काम करीत असलेल्या पाच शेतकऱ्यांवर हिंस्त्र प्राण्याने (तडस) प्राणघातक हल्ला करुन जखमी केल्याची घटना शनिवारी सकाळी तालुक्यातील भोलाणे परिसरात घडली. कुत्री धावल्याने या प्राण्याने तिथून पलायन केले. दरम्यान, जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर गावकºयांनी या प्राण्याचा शोध घेवून त्याचा दुपारी खात्मा केला.लक्ष्मण श्यामराव कोळी (४५), संजय तोताराम सपकाळे (४०), विलास तुळशीराम कोळी (३५, सर्व रा. भोलाणे, ता.जळगाव), सुखदेव धुडकू सपकाळे (४०, रा.कानसवाडे, ता. जळगाव) व युवराज शांताराम सोनवणे (४०,रा.देऊळवाडे, ता. जळगाव) अशी या जखमी शेतकºयांची नावे आहेत. संजय सपकाळे व युवराज सोनवणे हे दोघे तापी नदीकाठी असलेल्या शेतात वांगी तोडत असताना तडसाने या दोघांवर अचानक हल्ला चढविला. स्वत:चा बचाव करण्यासाठी या शेतकºयांनी या प्राण्याशी झुंज दिली. सकाळी साडे सात ते साडे आठ असा एक तास शेतकरी व प्राण्यात संघर्ष सुरु होता. या शेतकºयांनी परतवून लावल्यानंतर या तडसाने शेतात काम करीत असलेल्या लक्ष्मण कोळी व सुखदेव कोळी यांच्यावर हल्ला चढविला. या दोघांच्या शरीरावर नखे व दातांनी ओरबडले आहे. नंतर या प्राण्याने भोलाणे गावात एका म्हशीचे लचके तोडले. त्याचवेळी गावातील १० ते १२ कुत्री या प्राण्याच्या अंगावर धावून आल्याने त्याने तिथून पळ काढला. यानंतर दुपारी एका शेतात काम करीत असलेल्या विलास कोळी यांच्यावरही हल्ला चढवून जखमी केले. या सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.गावकºयांनी केले ठारशनिवारच्या घटनेत गावातील तरुणांनी या तडसाचा पाठलाग केला. नाल्याकाठी लपून बसलेल्या या तडसाला घेरुन दगडाने ठेचून ठार केले. तडस ठार झाल्याने गावकºयांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान, या घटनेनंतर वनविभागाचे सहायक वनसंरक्षक सी.आर.काबंळे, एन.जी.पाटील, दीपक पाटील, अश्विनी ठाकरे आदींनी घटनास्थळी भेट दिली. तडसाचे प्रेत वन विभागाने ताब्यात घेतले.
थरार... तासाभराची झुंज अन् हल्ला करणाऱ्या तडसाचाच खात्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2020 12:11 PM