अजय पाटील
जळगाव : कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडियामार्फत (सीसीआय) राज्यात ६४ कापूस खरेदी केंद्रे १५ आॅक्टोबरपासून सुरू होणार असल्याची माहिती ‘सीसीआय’च्या खरेदी विभागाचे महाव्यवस्थापक अतुल काला यांनी ‘लोकमत’ला दिली. शासनाने कापसाचा ५ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल दर निश्चित केला आहे.
औरंगाबाद विभागात ३५ तर विदर्भात २९ तर खान्देशात १३ खरेदी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. सीसीआयप्रमाणेच महाराष्टÑ कापूस फेडरेशनकडूनही ५५ कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. कापसात ओलावा असल्याने गेल्या आठवड्याभरात भावात एक हजार रुपयांची घट झाली. ४,४०० ते ४,५०० रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी केला जात आहे. विदेशात चांगली मागणी असल्याने ५० ते ५५ लाख गाठींची निर्यात होण्याची अपेक्षा आहे. राज्यात ४० लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे.