शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

९० लाखांचा कापूस घेऊन पसार झालेल्या ठगास अटक 

By चुडामण.बोरसे | Published: January 28, 2023 4:50 PM

वाडी ता. पाचोरा येथील शेतकऱ्यांकडील ८५ ते ९० लाखांचा कापूस घेऊन फरार झालेल्या ठगास नवसारी येथून अटक करण्यात आली आहे. 

पिंपळगाव (हरेश्वर) जि. जळगाव : वाडी ता. पाचोरा येथील शेतकऱ्यांकडील ८५ ते ९० लाखांचा कापूस घेऊन फरार झालेल्या ठगास नवसारी येथून अटक करण्यात आली आहे. 

राजेंद्र भीमराव पाटील (३४, रा. वाडी- शेवाळे ता. पाचोरा) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गेल्या वर्षी वाडी - शेवाळे आणि परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडील ८५ ते ९० लाख रुपये किंमतीचा कापूस उधार खरेदी करून तो पसार झाला होता.  कापसाचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला तक्रार केली होती.  पैसे परत मिळावेत, यासाठी  वाडी येथील शेतकऱ्यांनी अनेक दिवस उपोषणही केले होते.  काबाडकष्ट करून पिकविलेल्या कापसाचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त होते. 

राजेंद्र हा नवसारी (गुजरात) येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार नवसारी येथे पोलीस पथक रवाना करण्यात आले. तिथून त्याला अटक करुन पिंपळगाव येथे आणण्यात आले. त्याला ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली पी.एस.आय अमोल पवार, मुकेश लोकरे, जितेंद्र पाटील, रणजीत पाटील, शिवनारायण देशमुख, उज्वल जाधव, अभिजीत निकम, प्रवीण देशमुख यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी