जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील डॉ.विश्वेश अग्रवाल यांच्या हॉस्पीटलसमोर असलेल्या हॉटेल केवलच्या वाहन पार्कीगमध्ये लावलेल्या एका कारने अचानक पेट घेतल्याची घटना मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. ही घटना पाहणा:यांनी अक्षरश: ‘द बर्निग कार’ चा थरार अनुभवला. शॉर्ट सर्कीटमुळे कारला आग लागल्याचे सांगण्यात आले. सुदैवाने कारमध्ये कोणीही नसल्याने मोठी हानी टळली. या आगीत कारचा फक्त सांगाळाच शिल्लक आहे.अमीनोद्दीन शमसोद्दीन शेख (रा.तांबापुरा, जळगाव) हे कामानिमित्त मंगळवारी हॉटेल केवलमध्ये आलेले होते. हॉटेलच्या शेजारील इमारतीत कार पार्कीगची व्यवस्था आहे. त्या ठिकाणी कार (क्र.एम.एच.19 ए.ई.1053) पार्कीग करुन शेख बाहेर गेले होते. याच कारच्या शेजारी हॉटेल मालकाचीही कार होती. शेख यांच्या कारमधून अचानक धूर येवू लागला. त्यानंतर पेट्रोलच्या नळ्यार्पयत ठिणग्या पोहचल्याने कारने भडका घेतला. हा प्रकार पाहताच कर्मचारी व रस्त्यावरील नागरिकांनी धाव घेत पाण्याने आग विझविण्यास सुरुवात केली. दोन महिन्यापूर्वी महामार्गावर झालेल्या अपघातात कार पेटून त्यातील तीन जणांचा जागेवरच कोळसा झाला होता, या घटनेची आठवण यानिमित्ताने आली होती.
‘द बर्निग कार’ चा थरार..
By admin | Published: February 08, 2017 1:05 AM