चोपडा/ बिडगाव: चोपडा तालुक्यातील बिडगावसह सातपुडा परिसराला रविवारी १४ रोजी दुपारी सुमारे एक तास जोरदार वादळी अवकाळी पावसाने झोडपून काढले. यामुळे काही ठिकाणी विजेचे खांब व वृक्षही कोसळले. याचरोबर शेवरे येथे अनेक घरांवरील छप्परही उडून गेल्याने अनेकांचा संसार उघड्यावर आला. तसेच शेतशिवारातील जेमतेम असलेला गुरांचा मका व गव्हाचा चाराही खराब झाला. तर चोपडा तालुक्यातील मराठे येथे सायंकाळी शेतात चारा घेण्यासाठी गेलेल्या बुधा कहारु भिल (वय ५०) याच्या अंगावर वीज कोसळून तो भाजला जावून बेशुद्ध पडला. यानंतर त्यास उपजिल्हा रुग्णालयात चोपडा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.सातपुडा पर्वतातील कुंड्यापाणी, शेवरे, बिडगाव, वरगव्हान, लासूर परिसरात रविवारी दुपारी साडेतीन ते सव्वाचार दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. बिडगावजवळ विजेचे चार खांब कोसल्याने विजपुरवठाही ठप्प झाला होता. अचानक आलेल्या पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली. काहींनी शेतात साठवुन ठेवलेला मका तसेच व्यापारींनी घेतलेला मका व गहु झाकतांना चांगलीच धांदल उडाली.शेवरे येथे अनेक घरांचे छत उडून नुकसान झाले.कुंड्यापाणी व शेवरे येथे जोरदार पाऊसअगदी सातपुड्याला लागुन असलेल्या कुंड्यापाणी व शेवरे या गावांना तब्बल ४५ मिनटे पावसाने हजेरी लावली. पाणी वाहुन निघाले तर अनेक गोरगरीब आदिवासींच्या घरांवरील छते उडाल्याने संसार उघड्यावर आला व पाणी घरात घुसल्याने धांदल उडून नुकसानही झाले. काही ठिकाणी वृक्षही उन्मळले.लासूर येथे पाऊण तास पाऊसलासुर येथे सायंकाळी ५वाजेपासून वादळी वारा आणि विजांच्या जोरदार कडकडाटासह पावसास सुरुवात झाली. पाऊण तास जोरदार पाऊस झाला. यामुळे वीजप्रवाह खंडित झाला आहे. ज्या शेतकºयाचा कांदा व इतर पीक तयार करून शेतात आहेत ती पिके खराब झाल्याची भीती निर्माण झाली आहे.जामनेर व पाचोरा तालुक्यातही हजेरीपाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरे. येथे व जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथेही रात्री नऊ वाजेच्या सुमारास सौम्य वादळासह पावसाने हजेरी लावली.याचबरोबर जळगाव जिल्ह्याला लागून असलेल्या मराठवाड्यातील सोयगाव शहर व परिसरात संध्याकाळी नऊ ते साडे नऊच्या सुमारास जोरदार वादळी वारे वाहू लागले आणि हलका पाऊस झाला वादळी वाºयामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता.चोपडा शहरात वाºयासह शिडकावचोपडा शहरात वादळी वाºयासह सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान अवकाळी पावसाचा शिडकाव झाला. मेघ गर्जनेसह विजांचा कडकडाटात जोरदार वाºयामुळे अनेक भागातील वीज गायब झाली. तर ढगाळ वातावरण वाºयामुळे अत्यंत कडक असलेल्या उन्हाचा पारा एकदम कमी झाल्याने नागरिकांना तेवढा गारवा जाणवला.पिकांचे नुकसानजोरदार ºयामुळे काही ठिकाणी काढणीवर आलेला गहू, मका व बाजरी आडवी होऊन जमीनदोस्त झालेत तर कांदा पिकालाही फटका बसणार असल्याचे सांगितले जाते.
वादळी पावसाने चोपडा तालुक्याला झोडपले, वीज कोसळून एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 10:00 PM