प्रसाद धर्माधिकारीनशिराबाद (जळगाव) : अस्मानी संकटाने गुरुवारी दुपारी तालुक्यातील बेडी परिसरात हाहा:कार माजविला. गारपिटीसह चक्रीवादळामुळे सुमारे २०० घरांची पडझड झाली आहे. पत्र्यांसह छत उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले असून या घटनेत तिघे जखमी झाले आहेत. तर या भागातील ४० विद्युत पोलही कोसळून पडल्याने बेडीसह परिसर अंधार सापडला आहे. तर ५० वर झाडे उन्मळून पडल्याने नशिराबाद-बेडी रस्त्यावरची ठप्प झालेली वाहतूक सायंकाळनंतर सुरळीत करण्यात प्रशासनाला यश आले आहे.
नारायण गोविंदा पाचपांडे, सरिता रवींद्र नारखेडे, भागवत चिंधू नारखेडे असे या जखमींची नावे आहेत. गुरुवारी दुपारी अडिच वाजेच्या सुमारास गारांनी बेडीला पिटाळले. त्यापाठोपाठ आलेल्या भयंकर वादळाने अनेकांचा संसार उद्ध्वस्त केला. अनेक जुन्या वृक्षांसह ५० वर झाडे उन्मळून पडल्याने अनेकांचे नुकसानही झाले आहे.
२०० घरांचे नुकसानएक हजार लोकसंख्येच्या बेडी गावात मजूर वर्ग मोठ्या संख्येने वास्तव्याला आहे. मजुरांच्या गाववेशीवर असणाऱ्या सुमारे २०० झोपड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर गावातील १० घरांची पडझड झाली आहे. पत्रे उडून गेल्याने जि.प.शाळाही उघड्यावर आली आहे.