जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार मंडळ आणि उद्यमी महिला नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी व.वा.वाचनालयाच्या सभागृहात महिलांसाठी तंत्रज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.महिलांसाठी चला मैत्रिणींनो स्मार्ट होऊ या असे नाव असलेल्या या कार्यशाळेत मोबाईलची ओळख, मोबाईल सुरक्षितता, नेट बँकिग, गुगल मॅप, तिकीट बुकिंग आदी नव्या तंत्रज्ञानाची ओळख करुन दिली जाणार आहे. गुरुवारी दुपारी १ ते ५ या वेळेत ही कार्यशाळा होणार असून प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहूलीकर यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. मुंबई येथील नामांकित आयटी तज्ञ मिनल पटेल या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. नाव नोंदणी करणे आवश्यक असल्याची माहिती मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.मनिष जोशी यांनी दिली.
गुरूवारी महिलांसाठी तंत्रज्ञान कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 7:05 PM