ऑनलाईन लोकमत / संजय पाटील
अमळनेर, जि.जळगाव , दि. 4 - जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक डिजिटल शाळा आणि सर्वाधिक आय.एस.ओ. मानांकित शाळा म्हणून कौतुक होत असलेल्या अमळनेर तालुक्याच्या मठगव्हाण येथे जिल्हा परिषद शाळेत दोन तरुणींना गावकरीच अत्यल्प पगार देऊन मुलांना शिकविण्याचे काम करून घेत आहे. माहितीचा अधिकार कायद्याच्या अंमलबजावणी नंतरही शिक्षण क्षेत्रातील ही विसंगती अधिका:यांच्या कार्यपद्धतीबद्दल सांशकता व्यक्त करते तालुक्यात मठगव्हाण येथील जि.प.शाळेत पहिले ते सातवीपयर्ंत वर्ग असून 182 पटसंख्या आहे. तेथे फक्त 4 शिक्षक कार्यरत आहेत. वारंवार मागणी करूनही तेथे शिक्षक नेमले गेले नाही. शहरापासून लांब तापी खो:यातील गाव असल्याने शिक्षकही तेथे जाण्यास अनुत्सुक असतात. गावातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून गावातील ग्रामस्थ अधिकारी असलेले वासुदेव पवार आणि सामाजिक कार्यकर्ते किरण पवार यांनी गावातीलच दोन तरुणींना प्रत्येकी दोन हजार रुपये वेतन देऊन मुलांना शिकवण्यासाठी नेमले. त्या मुली उत्कृष्टपणे ज्ञानदान करीत आहेत. तसेच वर्ग खोल्याही अपूर्ण होत्या. मागणी करूनही खोल्या मिळाल्या नाहीत. अखेरीस भगवान पवार, राजेंद्र सोनवणे, भरत शिरसाठ या ग्रामस्थांनी प्रत्येकी एक वर्ग खोली बांधून दिली. शाळेच्या आधीच्या चार खोल्या गळक्या आहेत. इतर गावात शाळा खोल्या जादाच्या असताना मात्र राजकीय पाठिंब्या अभावी ही विसंगती दिसून येते. केदार पवार, महेश पवार, सुधाकर पवार आदींनी संगणक ,फर्निचर, प्रोजेक्टर उपलब्ध करून दिले. आता शाळा व्यवस्थित सुरू आहे. दुसरीकडे लोंढवे येथे 1 ते 7 वर्गावर 150 पटसंख्या असताना 8 शिक्षक कार्यरत होते. मात्र विद्याथ्यार्नाभवी 5 ते 7 वर्ग बंद पडले.त्याठिकाणी चार शिक्षक अतिरिक्त होतील. उपसभापती त्रिवेणीबाई पाटील यांनी दखल घेऊन लोंढवे येथील एक शिक्षिकेची मठगव्हाण.ला बदली केली मात्र त्या शिक्षिकेने रुजू होण्याऐवजी रजा टाकली दुसरा एक पदवीधर शिक्षक आजारी आहे त्याची ही लोंढव्याहून बदली केली त्याने पदावनती घेतली आहे.अडचणींवर मात करत येथील मुख्यध्यापक दिनेश मोरे व सहका:यांनी लोकसहभाग वाढवून गुणवत्ता टिकवली आहे.तालुक्यातील इतर ठिकाणचे जादा शिक्षक काढून शैक्षणिक समतोल राखला जाईल कर्तव्यातून पळ काढणा?्या शिक्षकावर कारवाई केली जाईल असे पंचायत समितीच्या उपसभापती त्रिवेणीबाई पाटील यांनी सांगितले.शिक्षक पाठवू सावखेडा, गंगापुरी, रुंधटी आदि ठिकाणाहून शिक्षक मठगव्हाणला पाठवले जातील. वरिष्ठ अधिका:यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे प्रभारी गटशिक्षणाधिकारी पी. डी. धनगर यांनी सांगितले.