अमळनेर नपाची उपाययोजना : पाणी आवर्तन
अमळनेर, दि.30- शहराला पाणी पुरवठा करणा:या जळोद डोहात आठ दिवसांचा साठा शिल्लक आहे. नगरपालिकेने पाण्याचे आवर्तन अडविण्यासाठी तापी नदीपात्रात जळोद पुलाच्या पश्चिमेकडे सहा फूट उंचीचा वाळू बांध बांधला आहे. त्यामुळे जळोद डोहात 13 फूट पाण्याची पातळी वाढणार आहे.
अमळनेर शहराला पाणी टंचाई भासू नये, म्हणून नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, मुख्याधिकारी पी.जी.सोनवणे यांनी दखल घेऊन, तापी नदीपात्रात आवर्तनाचे पाणी साठविण्याठी 6 फूट उंचीचा तात्पुरता बांध बांधला आहे. आवर्तनासाठी हतनूर प्रकल्पाकडे 10 लाख रूपयांचा धनादेश जमा केला आहे. आवर्तन मिळाल्यानंतर जळोद डोहात पाणीसाठा होऊन, पाणी पातळी 13 फूटार्पयत वाढणार आहे. शहराला 20 मे र्पयत पाणी पुरणार असल्याची माहिती मुख्य अभियंता श्यामकुमार करंजे यांनी दिली. सध्या जळोद डोहात साडेचार फूटउंचीर्पयत पाणी शिल्लक आहे. चारीद्वारे गंगापुरी डोहातून पाणी आणले जात आहे.