आॅनलाइन लोकमतमुक्ताईनगर, जि. जळगाव, दि. २३ - मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा भागात एक वाघीण मृतावस्थेत आढळून आली असून या घटनेने खळबळ उडाली आहे.मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा भागातच गेल्या अनेक दिवसांपासून वाघाचे हल्ले सुरू आहेत. यात एका शेतक-याचा मृत्यूदेखील झाला व अनेक पाळीव गुरांवरही पट्टेदार वाघाने हल्ले केले.गुरुवारी सकाळी सुकळी शिवारात असलेल्या गट क्रमांक ४८मध्ये जयराम काशिराम पाटील यांच्या शेतात वाघीण मृतावस्थेत आढळून आली. पाटील यांना शेतात ही वाघीण दिसल्यानंतर ती झोपलेली असल्याचे समजून त्यांनी वनविभागास कळविले. वनविभागाने पाहणी केली असता ही वाघीण मृतावस्थेत असल्याचे लक्षात आले.या वेळी येथे बघ्यांची गर्दी झाली होती. नंतर वनविभागाने सर्व जणांना ५०० मीटरच्या बाहेर काढले. वाघिणीचा नैसर्गिक मृत्यू असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे, मात्र याच भागात वाघाचे हल्ले सुरू होते व आज तेथेच वाघीण मृतावस्थेत आढळून आल्याने घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा आहे.
खळबळजनक : वाघाचे हल्ले होणाऱ्या डोलारखेडा भागातच वाघिणीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 1:22 PM
आॅनलाइन लोकमतमुक्ताईनगर, जि. जळगाव, दि. २३ - मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा भागात एक वाघीण मृतावस्थेत आढळून आली असून या घटनेने खळबळ उडाली आहे.मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा भागातच गेल्या अनेक दिवसांपासून वाघाचे हल्ले सुरू आहेत. यात एका शेतक-याचा मृत्यूदेखील झाला व अनेक पाळीव गुरांवरही पट्टेदार वाघाने हल्ले केले.गुरुवारी सकाळी सुकळी शिवारात असलेल्या गट ...
ठळक मुद्देवनविभागाने सर्व जणांना ५०० मीटरच्या बाहेर काढलेवाघिणीचा नैसर्गिक मृत्यू असल्याचे वनविभागाचे म्हणणे