जळगाव : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी ७ जुलैपासून शहरात लॉकडाऊनच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून जळगावकरांनी या आदेशाचे पालन करुन व्यवहार पूर्णपणे बंद ठेवले. त्यामुळे शहरातील रत्यावर दिवसभर शुकशुकाट दिसून आला. कोरोनाला रोखण्यासाठी जळगावकरांनी आपली एकजूट दाखवून दिली. पहिल्या लॉकडाऊनपेक्षाही या लॉकडाऊनला भरघोस प्रतिसाद देत शहरवासीयांनी बंद पाळला. यामुळे शहरातील रस्ते, विविध चौक सकाळापासूनच सामसूम होते. रस्त्यावर केवळ पोलीस आणि अत्यावश्यक सेवा देणारी मंडळीच असल्याने सर्वत्र शांतता पसरली होती.
जळगाव शहर व जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. एकट्या जळगाव शहराने हजाराचा आकडा पार केल्याने चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे ही साखळी खंडीत करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ७ ते १३ जुलै या कालावधीत कडक लॉकडाऊन जाहीर केले. त्याच्या पहिल्या दिवशी रस्ते, विविध चौक निर्मनुष्य तर बाजारपेठ कडकडीत बंद होती. बहुतांश उद्योजकांनी स्वयंस्फूर्तीने उद्योग बंद ठेवले आहेत.जनता कर्फ्यूनंतर कडकडीत बंदअनेकवेळा वेगवेगळ््या कारणांनी बंद पुकारण्यात येतो. त्याला कमी-अधिक प्रतिसाद मिळत असतो. मात्र सध्या कोरोनामुळे जळगावकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने स्वत:च्या कुटुंबासह शहरवासीयांच्या आरोग्यासाठी सर्व जळगावकर एकवटले. कोणीच बाहेर पडत नसल्याने शहरातील टॉवर चौक, चित्रा चौक, नेहरु चौक, रथ चौक, स्वातंत्र्य चौक, स्टेट बँक चौक, कोर्ट चौक, काव्यरत्नावली चौक सामसूम होते. इतकेच नव्हे शहरातील सर्वच रस्ते निर्मनुष्य होते. प्रत्येक चौक व रस्त्यावर ठिकठिकाणी पोलीस प्रत्येक व्यक्तीला अडवून चौकशी करीत होते.जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक उतरले रस्त्यावरलॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी होते की नाही, याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले स्वत: रस्त्यावर उतरले होते. शहरातील मार्केट तसेच मुख्य मार्गावर फिरुन त्यांनी बंदोबस्ताचा आढावा घेऊन कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी गांधी मार्केट, भिलपुरा चौक या भागात बंदोबस्तावरील पोलिसांची आस्थेवाईकपणे चौकशी करुन त्यांचे मनोबल वाढविले.बाजारपेठ कडकडीत बंद... व्यापारनगरी असलेल्या जळगावातील बाजारपेठही कडकडीत बंद होती. तसेच विविध दुकाने, हॉटेल व इतर सर्व अस्थापना बंद ठेवून कोणीही घराबाहेर पडणार नाही याची दक्षता सर्वांनी घेतली. नेहमी वर्दळ असलेले शहरातील महात्मा फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, गोलाणी मार्केट, महात्मा गांधी मार्केट, बी.जे. मार्केट, सुभाष चौक परिसर, सराफ बाजार, दाणा बाजार इत्यादी प्रमुख व्यापारी ठिकाणे पूर्णपणे बंद होती.जळगावकर नागरिक, व्यापारी, उद्योजक बांधव यांच्या सहकार्याने लॉकडाऊनचा पहिला दिवस यशस्वी ठरला. त्यामुळे हे सर्व जण अभिनंदनास पात्र आहे. तसेच सर्व शासकीय यंत्रणांनी १०० टक्के सहभाग नोंदविला. पहिल्या दिवसाप्रमाणे सातही दिवस नागरिकांचे सहकार्य राहिल्यास नक्कीच कोरोनाला आळा बसविता येऊ शकले.- अभिजित राऊत, जिल्हाधिकारी.जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी समजून प्रशासनाच्या नियमांचे पालन करुन घरातच थांबावे. पहिल्या दिवशी जळगाव, भुसावळ व अमळनेर येथे नागरिकांनी सूचनांचे पालन प्रशासनाला सहकार्य केले. पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी देखील दिवसभर रस्त्यावर होते. जेथे विनाकारण नागरिक रस्त्यावर आले, तेथे कारवाया करण्यात आल्या. पाच वाजेपर्यंत जिल्ह्यात १९ जणांवर कारवाया झाल्या होत्या. आगामी काळात देखील जनतेने असेच सहकार्य करावे व कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करावे.-डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षककारबाबत संभ्रम, दुपारी एसपींकडून स्पष्टताअत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त रस्त्यावर कोणत्याच वाहनाला परवानगी नव्हती. बरेच उद्योजक कारने एमआयडीसीत जात असताना त्यांना अडविण्यात येत होते. अत्यावश्यक सेवेतील कारही अडविण्यात येत असल्याने त्याची गंभीर दखल पोलीस अधीक्षकांनी घेतली. अत्यावश्यक सेवा व उद्योजकांच्या कारला परवानगी देतानाच त्यांच्यासोबत फक्त एका व्यक्तीला मान्यता देण्यात आली. त्याबाबतचा संदेश पोलीस अधिकाºयांच्या व्हाटस्अॅप ग्रुपवर पाठविला. याव्यतिरिक्त बंदोबस्तावरील कोणत्याही अधिकारी, कर्मचाºयास अडचण असल्यास त्यांनी नियंत्रण कक्षात संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी केले.लॉकडाऊनचे उल्लंघन; पेट्रोलपंप व्यवस्थापकासह दोघांवर गुन्हालॉकडाऊन असताना पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या दुचाकीचालक, पेट्रोल पंप व्यवस्थापक व कर्मचाºयावर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी ८.३० ते ९ वाजेच्या सुमारास पलोड पेट्रोलपंपावर दुचाकीचालक शेख अजगर शेख चांद (४० रा. शाहूनगर) हे दुचाकीने (एम.एच १९ आर २५८३) पेट्रोल भरण्यासाठी आले. ते अत्यावश्यक सेवेत नसतानाही त्यांना पेट्रोलपंपावर पंप कर्मचारी खलील शेख गनी पिंजारी (४०,रा. खंडेराव नगर) याने पेट्रोल दिले. हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात पलोड पेट्रोल पंप व्यवस्थापक अशोक हनुमंत पाटील (५१ रा. नंदनवन नगर) यांच्यासह पेट्रोलपंप कर्मचारी आणि दुचाकीधारक यांच्यावर लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.भाजी विक्रेत्यांविरुध्द गुन्हा दाखललॉकडाऊनमध्ये बंदी असतानाही हातगाडीवर भाजी विक्री करणाºया इसाक नजीर खाटीक (४०, रा. शेरा चौक) व आबा भिकन सावळे (४०, रा. रामेश्वर कॉलनी) या दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात जिल्हाधिकाºयांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. बाजार समिती ते काशिनाथ हॉटेल चौक या दरम्यान सुरक्षित अंतर न पाळत भाजी विक्री करीत होते. त्याशिवाय कंजरवाड्यात दारुविक्री करणाºया शितल रमेश माचरेकर या महिलेविरुध्द कारवाई करण्यात आली. तिच्याजवळील २४ हजार रुपये किंमतीचे रसायन जप्त करण्यात आले. एमआयडीसीतील व्ही सेक्टरमध्ये देशी दारु विक्री करणाºया सागर नारायण सोनवणे (रा. सुप्रीम कॉलनी) यांच्याविरुध्दही कारवाई करण्यात आली. ही कारवाई सहायक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, मुदस्सर काझी, नरेंद्र सानेवणे, मुकेश पाटील व सचिन पाटील यांनी केली. यानंतरही असे प्रकार घडल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.