सुशीलदेवकरजळगाव: केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी ‘उडान’ योजनेंतर्गत मुंबई-जळगाव विमानसेवेसाठी नियुक्त डेक्कन एअर कंपनीला मुंबई विमानतळावरून उड्डाणासाठी ‘टाईम स्लॉट’ मिळत नसल्याने अडथळा निर्माण झाला आहे. या योजनेसाठी कंपनीला महाराष्टÑातील सेवेसाठी १० ‘टाईम स्लॉट’ची गरज असताना मुंबई विमानतळाने कंपनीच्या पाठपुराव्यानंतर केवळ २ टाईम स्लॉट देण्याची तयारी दर्शविली आहे.
‘टाईम स्लॉट’ बाबत आज बैठकटाईम स्लॉट उपलब्ध नसल्याचे मुंबई विमानतळाच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे. त्याबाबतही सोमवार, दि.३० रोजी बैठक होत आहे. यात तोडगा निघाल्यास जळगाव-मुंबई विमानसेवा नोव्हेबरच्या तिसºया आठवड्यात अथवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता ‘डेक्कन एअरवेज’च्या सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
सेवेसाठी विमानतळ सज्जआता नोव्हेंबरपासून विमानसेवा सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अद्यापही त्याबाबत विमानतळावर व जिल्हा प्रशासनाला कोणतीही सूचना नाही. विमानतळ या सेवेसाठी सज्ज असले तरीही विमान कंपनीचीच अडचण असल्याने ही सेवा सुरू होऊ शकलेली नाही. त्याबाबत ‘लोकमत’ने ‘डेक्कन एअर’चे अधिकारी सुंदरम यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला असता मुंबई विमानतळावरून ‘टाईम स्लॉट’ मिळत नसल्याने ही योजना अडली असल्याचे सांगितले.
२ टाईम स्लॉट उपलब्धकंपनीला दोन स्लॉट देण्याची तयारी मुंबई विमानतळ प्राधिकरणाने दर्शविली आहे. मुंबई सारख्या मोठ्या शहरांना ‘टाईम स्लॉट’अभावी जर कनेक्टीव्ही जर मिळणार नसेल तर कंपनीला ही सेवा कशी परवडेल? असा सवाल कंपनीने मुंबई विमानतळ प्राधिकरणाला केला आहे. तसेच ‘एअर आॅपरेट परमिट’ मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते मिळाले की सेवेला सुरूवात होईल. कंपनीकडे दोन विमाने उपलब्ध असून त्याद्वारे हे सेवा सुरू करता येईल. त्यात मुंबई -नाशिक व त्यानंतर मुंबई-जळगाव सेवेला प्राधान्य राहील, असेही त्यांनी सांगितले.
मुंबईहून पहाटे ५.३०ला जळगावसाठी विमानसेवाटाईम स्लॉट मिळून ही सेवा सुरू झाल्यास मुंबईहून पहाटे ५.३० वाजता जळगावकडे फ्लाईट असेल. ती जळगावला सकाळी ६.३५ वाजता पोहोचेल. तर जळगावला २० मिनिटे थांबा घेऊन ६.५५ वाजता तेच विमान प्रवासी घेऊन मुंबईला रवाना होईल, असा प्रस्ताव कंपनीने मुंबई विमानतळ प्राधिकरणाला ‘एअर स्लॉट परमिट’साठी दिला आहे.
१५ सप्टेंबरपासून सुरुहोणारहोतीविमानसेवा२५०० रूपयात जळगाव ते मुंबई विमान सेवेस १५ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार असल्याची घोषणा केंद्र शासनाने केली होती मात्र ही सेवा १५ रोजी सुरु होऊ शकली नाही. आता नोव्हेंबरमध्ये ही सेवा सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जळगावकरांचा हिरमोड झाला आहे. ‘उडाण उडे देश का आम आदमी’ असे घोषवाक्य करून ‘उडाण’ ही विमानसेवेची योजना केंद्र सरकारने मार्च २०१७ मध्ये घोषित केली. देशात बांधून तयार असलेल्या विमानतळांवरून ही सेवा देण्याचा निर्णय होता. यात जळगाव विमानतळाचाही समावेश होता. जळगावातून विमानसेवा सुरू व्हावी अशी अनेक वर्षांपासून मागणी होती. स्थानिक उद्योजकांच्या शिष्टमंडळाने मुंबईत जाऊन विमान विकास प्राधिकरणाच्या अधिकाºयांची भेट घेऊन सेवा सुरू करण्याबाबत पाठपुरावा केला होता. ही मागणी लक्षात घेऊन गेल्या वर्षी राज्य शासनाने भारतीय विमानतळ प्राधिकरण व केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालया सोबत राज्य सरकारने करार केला होता. त्यामुळे ‘उडान’ योजनेत जळगावचा समावेश करून जळगावसह राज्यातील अनेक विमानतळांवरून विमान सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. ही सेवा नियोजित वेळापत्रकानुसार १५ सप्टेंबरपासून सुरू होणार होती. मात्र ती सुरू होऊ शकली नाही.