जळगाव: तांडव सारख्या वेबसिरीजच्या माध्यमातून हिंदू देवतांची, प्रार्थना स्थळांची टिंगलटवाळी केली जात असून ती खपवून घेणार, असे सांगत कठोर कारवाईची मागणी हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक धनंजय देसाई यांनी केली आहे. त्यांनी शुक्रवारी जळगावात पत्रकार परिषद घेतली.
राष्ट्रभक्त नागरिकांनी संघटित होणे आवश्यक असून त्यांना संघटित करणे, कृतीप्रवन करणे, हे हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. जाणीवपूर्वक हिंदू संस्कृतीची विटंबना केली जात आहे, यासाठी ओ टिटी प्लेटफॉर्मचा वापर केला जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली लोकांची दिशाभूल केली जात आहे. असेही देसाई म्हणाले. सध्याचे शेतकरी आंदोलन हायजॅक झाले असून पोट भरलेली लोक त्यात सहभागी झाली आहेत, शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचे देसाई यांनी सांगितले.
जळगाव हे सिमीचे बालेकिल्ला राहिले आहे यात काहींना पकडले काही माफीचे साक्षीदार झाले व त्यांना आता पुरस्कार दिले जात असल्याचेही देसाई म्हणाले. राममंदिराला उशीर झाला, ही भारताच्या शुद्धीकरणाची सुरुवात असल्याचे ते म्हणाले.