नशिराबाद: नवग्रहांतील शनीचा आज शुक्रवारी मकर राशीत प्रवेश होत आहे त्याचा पुण्यकाल शुक्रवारी सकाळी सात वाजेपासून ते दुपारी १२.४७ पर्यंत राहणार आहे. शनीच्या मकर राशीतील प्रवेशामुळे धनु , मकर व कुंभ या राशीला साडेसाती आहे. तर वृश्चिक राशीची साडेसाती आता संपत आहे.शनीची साडेसाती म्हटली की सर्वांच्याच अंगाला काटा उभा राहतो. शनि लागला म्हणजे सर्वच बाबतीत नुकसानाला सामोरे जावे लागते असा सर्वांचा समज आहे. शनी ग्रह न्यायप्रिय देवता आहे. साडेसाती म्हणजे साडे सात वर्षांचा कालखंड. शनीला एक राशी भोगण्यास अडीच वर्ष लागतात .जीवनाची खरी बाजू दाखवण्याची ताकद ही फक्त शनितच आहे.शनी ग्रहाची उपासना नामजप हवन, हनुमान स्तोत्र , शनी महात्म्य शनि स्तोत्र पठण, पिंपळाची उपासना केल्याने शनि ग्रहाची तीव्रता कमी होते असे शास्त्रवचन आहे.मकर राशीत शनिच्या प्रवेशामुळे मकरेला पहिला, धनू राशीला दुसरा, वृश्चिकेला तिसरा, तुला राशीला चौथा, कन्याला पाचवा, सिंहेला सहावा, कर्केस सातवा, मिथुनला आठवा, वृषभेस नववा ,मेष राशीला दहावा, मीनला अकरावा आणि कुंभ राशीला बारावा याप्रमाणे शनी ग्रह राहणार आहे. ज्योतीष शास्त्रीयदृष्ट्या शनी हा वायू तत्वाचा तसेच मकर व कुंभ राशीचा अधिपती आहे. त्याची आवडती रास कुंभ आहे. शनीचा प्रभाव प्रत्येकाच्या कुंडलीनुसार वेगवेगळा मिळतो. शनीचे भ्रमण ज्या स्थान व राशीतून सुरू असतं त्या स्थानावरून पाहिल्या जाणाऱ्या जीवनातील त्या त्या गोष्टींवर शनीचा प्रभाव पडतो. साडेसातीत शनि महाराज स्त्रियांना त्रास देत नाही. साडेसातीत स्वत:ची व सर्व सगेसोयरे यांची खरी ओळख शनिमहाराज करून देतात. २९ एप्रिल २०२२ रोजी शनी कुंभ राशीत प्रवेश करेल आणि १२ जुलै २०२२ रोजी पुन्हा मकर राशीत वक्री प्रवेश करेल.रास पाद फलसिंह- मकर- मीन - सुवर्ण चिंतावृषभ- कन्या- धनु - रौप्य शुभमेष -कर्क -वृश्चिक - ताम्र श्री प्राप्तिमिथुन- तुला- कुंभ- लोह कष्ट
आजपासून धनु, मकर, कुंभ राशीला साडेसाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 12:21 PM