लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणा:या श्रीक्षेत्र अमळनेरात शनिवार, 6 मे रोजी श्रीसंत सखाराम महाराजांचा रथोत्सव साजरा करण्यात येणार आहे. सायंकाळी 7.30 वाजता वाडी संस्थानपासून रथ मिरवणुकीस प्रारंभ होईल. दुस:या दिवशी पहाटेर्पयत सोहळाशहराचे धार्मिक, ऐतिहासिक वैभव असलेला हा सोहळा दुस:या दिवशी पहाटेर्पयत सुरू असतो. सुमारे 200 वर्षापासून सुरू असलेली ही परंपरा आजतागायत अखंडपणे सुरू आहे.मोहिनी एकादशीच्या दिवशी मुहूर्त बघून सायंकाळी रथ मार्गस्थ होत असतो. रथावर श्री लालजींची हातात धनुष्यबाण घेतलेली चांदीची मूर्ती स्थापन करण्यात येते. रथाला पहिली मोगरी लावण्याचा मान मुस्लीम समाजाला आहे. रथ बोरी नदीच्या पुलावर आल्यावर नदीपात्रात नयनरम्य आतषबाजी करण्यात येते. या रथोत्सवात सर्व समाजातील नागरिक सहभागी होत असतात. या उत्सवातून एकात्मतेचे दर्शन घडत असते.
अमळनेरात आज संत सखाराम महाराज रथोत्सव
By admin | Published: May 06, 2017 12:56 AM