साडेतीन तास व्हीसी
जळगाव : कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपाययोजनांचा वरिष्ठ पातळीवरून आढावा घेतला जात असून, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी व्हीसीद्वारे तीन तासांपेक्षा अधिक काळ आढावा घेतला. यात जळगावातील सर्वच प्रमुख डॉक्टर यावेळी उपस्थित होते.
जि. प. चा मार्ग खडतर
जळगाव : जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीसमोरील रस्ता खोदण्यात आल्याने या जुन्या इमारतीत वाहने नेताना मोठी कसरत करून जावे लागत आहे. समोरील दोनही रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडत असल्याचे चित्र आहे. यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडीही होत आहे.
तीन नवे रुग्ण
जळगाव : इतर जिल्ह्यांतील तीन नव्या रुग्णांची जिल्ह्यात नोंद करण्यात आली आहे. हे तीन रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. ही रुग्णसंख्या ६९४ वर पोहोचली आहे. यात ४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ६४७ रुग्ण बरे झालेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बाधित रुग्ण आढळून येत आहेत.