आॅनलाईन लोकमत,
जळगाव, दि.१-स्वच्छतेच्या विविध मानकांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणाºया देशातील १७२ शाळांना राष्टÑीय स्तरावरील ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्कारांचे केंद्रिय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते शुक्रवारी वितरण करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील यशवंतनगर, टोनगाव येथील जि.प.उर्दू शाळेचा देखील समावेश असून शाळेचे मुख्याध्यापक रईस खान,अश्फाक अहमद, अब्दुल गफार व विद्यार्थी अल्ताफ पिंजारी यांनी हा पुरस्कार स्विकारला.
दिल्ली छावणी परिसरातील केंद्रिय विद्यालयाच्या डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन सभागृहात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री उपेंद्र कु शवाह हे देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी ३ राज्य, ११ जिल्हे व १७२ शाळांना विविध श्रेणींमध्ये गौरविण्यात आले. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने २०१६-१७ साठी देशभरातील सर्व शाळांना ‘स्वच्छता विद्यालय पुरस्कार’ स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार देशभरातील २ लाख ६८ हजार शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
या निकषावर झाली निवडशाळांमधील पाण्याची उपलब्धता, शौचालयांची व्यवस्था, हात धुण्यासाठीची व्यवस्था, देखभाल व्यवस्था आणि वर्तणूक बदल व क्षमता विकास या मानकांवर शाळांची निवड करण्यात आली. यासाठी तालुका, जिल्हा, राज्य आणि देश पातळीवरील समित्यांनी गुणांकन करुन शाळांची निवड करण्यात आली. ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्कार प्राप्त शाळेला प्रशस्तीपत्र आणि ५० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.