जळगाव : लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी सागर पितांबर कोळी (२६, रा़वडगाव लांबे, ता़ चाळीसगाव) यास १० वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रूपयांचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. न्या़ पी़वाय़लाडेकर यांनी गुरुवारी हा निकाल दिला.सागर कोळी यास भादंवि कलम ३७६, पोक्सो कलम ६ नुसार १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास साधी कैदेची शिक्षा सुनावलीे़ सरकारपक्षातर्फे अॅड़ शिला गोडंबे व अॅड़ रमाकांत सोनवणे यांनी कामकाज पाहिले़
आमिष दाखवून अत्याचार, तरूणाला सक्तमजुरीची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 11:36 AM