सावदा, ता.रावेर, जि.जळगाव : सावदा शहरात चंपाषष्टी व श्रद्धास्थानी असलेल्या खंडोबाच्या देवस्थानात यात्रेनिमित्त ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषात गुरुवारी बारागाड्या उत्साहात ओढण्यात आल्या.खंडोबारायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी केली होती. सालाबादप्रमाणे यंदाही पुरातन काळापासून असलेल्या खंडोबाच्या देवस्थानात यात्रेनिमित्त भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यात्रेत मुलांच्या मनोरंजनाच्या विविध प्रकारच्या खेळण्याची दुकाने थाटण्यात आली होती. विविध प्रकारच्या हॉटेल्स, खेळण्याची दुकाने लागली होती.विविध रंगांचे लहान-मोठे पाळणे आदी स्टाल लावण्यात आले होते. भगत अशोक पवार यांनी सकाळी मंदिरात अभिषेक पूजन करून आरती केली. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास गावप्रदक्षिणा म्हणून शहरातील मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली.दरम्यान, भाविक भक्तांनी आनंद घेण्यासाठी सहभागी होऊन हातात विविध झेंडे घेऊन ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषात गाव प्रदक्षिणा पूर्ण केली व सायंकाळी सहा वाजता मंदिरासमोरच्या प्रांगणावर बारागाड्या मोठ्या ओढणार म्हणून बारा गाड्या चे पुजन चाकांना छापे घालून पाच प्रदिक्षणा उत्साहात घालून ओढल्या गेल्या. भाविकांनी भगवान खंडोबाच्या जय घोषात येळकोट येळकोट जय मल्हारच्या जय घोषात बारागाड्या ओढल्याचा आनंद घेतला.या वेळी नीलेश खाचणे, श्याम पाटील, गणेश माळी, मनीष भंगाळे, नोमा भंगाळे, मेघा धांडे सहकार्य केले. सूरज परदेशी, ईश्वर कुरकुरे, संतोष पाटील, वसंत भिरूड, आकाश वंजारी आदी असंख्य महिला भाविकांनी सहभागी होऊन दर्शनासाठी हजारोंनी सहभागी झाले होते. नगराध्यक्षा अनिता येवले, नगरसेविका, नगरसेवकांची उपस्थिती होती. सपोनि राहुल वाघ, पीएसआय आखाडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.
रावेर तालुक्यातील सावदा येथे ‘जय मल्हार’च्या गजरात खंडोबाची यात्रा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 5:17 PM
सावदा शहरात चंपाषष्टी व श्रद्धास्थानी असलेल्या खंडोबाच्या देवस्थानात यात्रेनिमित्त ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषात गुरुवारी बारागाड्या उत्साहात ओढण्यात आल्या.
ठळक मुद्देभाविकांनी ओढल्या बारागाड्या‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषयात्रेनिमित्त मनोरंजनाची दुकाने