रात्रीचे तापमानही कमीच : दिवसा मिळतोय गारठय़ाचा फिलींग
नंदुरबार, दि.30: राज्यात सर्वत्र तापमानाचा पारा चाळीशीच्या पार गेला असला, तरीही राज्यातील थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ येथे मात्र गारठा अद्यापही टिकून आह़े बुधवारी रात्री याठिकाणी रात्रीचे तापमान हे 16 ते 18 अंश तर गुरूवारी दुपारी चार वाजेर्पयत तापमान 28 डिग्री होत़े हे तापमान स्थिर राहून गार वारे कायम राहणार असल्याचे शहादा वनविभागाने कळवले आह़े
गेल्या 10 दिवसांपासून हे तापमान तोरणामाळ येथे स्थिर आह़े जिल्ह्याच्या इतर भागात नागरिक उष्ण हवेमुळे बेजार झालेले असताना, एकीकडे गार हवेने वातावरण तोरळमाळ येथे बहरले आह़े असे असतानाही नंदुरबार जिल्हा व राज्याच्या विविध भागातून याठिकाणी नियमित भेटी देणा:या पर्यटकांनी तोरणमाळकडे यंदा पाठ फिरवल्याचे सांगण्यात येत आह़े याठिकाणी असलेल्या खाजगी हॉटेल्स , वनविभाग व शासकीय विश्रामगृहात बुकींग शून्य आह़े तोरणमाळ येथे यशवंत तलाव, सिताखाई, नागाजरुन गुफा, सनसेट पॉईट यासह विविध पर्यटनस्थळांवर तुरळक एकदोन पर्यटक सध्या दिसून येत आहेत़ परीक्षा आणि मार्चची कामे यांचा काळ असल्याने याठिकाणी पर्यटक येत नसल्याचा दावा हॉटेल व्यावसायिकांकडून करण्यात येत आह़े साधारण वर्षातील पावसाळा सोडून आठ महिने तोरणमाळ हे पर्यटनासाठी सवरेत्कृष्ट असल्याचा दावा वनविभागाचा आह़े यंदा मात्र फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ापासून याठिकाणी पर्यटकांची गर्दी ओसरल्याची माहिती आह़े
यशवंत तलावाचे पाणी थंडगार
तोरणमाळ येथील यशवंत तलावातील पाणी दुपारचा काही वेळ वगळता गार राहत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आह़े यासोबतच सिताखाई आणि सनसेट पॉईंट या परिसरात वातावरणातील गारवा आल्हाददायक असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आह़े
तोरणमाळ येथे एप्रिल व मे मध्ये काही अंशी पर्यटक येण्याचे संकेत असतात़ तर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये पर्यटकांची वर्दळ कायम असत़े यंदा फेब्रुवारीपासूनच पर्यटकांची संख्या रोडावल्याचे एका खाजगी हॉटेलात व्यवस्थापक असलेल्या अनिल सामुद्रे याने सांगितल़े अद्याप याठिकाणी पर्यटकांचे बुकींगही सुरू झालेले नाही़ येत्या एप्रिलच्या मध्यात बुकींग सुरू होण्याची चिन्हे आहेत़