धरणगाव : तालुक्यातील जळगाव रस्त्याला असलेले कोविड सेंटर गेले पंधरा ते वीस दिवसांपासून बंद झाले आहे. विशेष बाब म्हणजे, धरणगावात गेल्या तीन दिवसांत एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे तालुका कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे.
धरणगावात वाढता कोरोना रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत तालुका कोरोनापासून लांब गेला आहे. शहरासह तालुक्यात एकही रुग्ण आढळलेला नाही. सामाजिक संघटनांनी काही दिवसांत ग्रामीण रुग्णालयात विविध प्रकारे उपक्रम राबवीत ऑक्सिजन सिलिंडर असेल, अन्य काही सेवा असतील, त्या पुरविण्यास प्रयत्न केला आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या तीन नूतन रुग्णांची संख्या २००च्या वर आढळून आले होते. मात्र, आता हे प्रमाण ओसरत आहे. त्यामुळे खाज्या नाईक हे कॉल सेंटरदेखील बंद झालेले आहे. त्या ठिकाणी एकही पेशंट आढळून आले नाही. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार हे कोविड सेंटर सुरू ठेवण्यात आले होते.
प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ, डॉ. गिरीश चौधरी, डॉ. सुनील बन्सी यांनी धरणगाव ग्रामीण रुग्णालयातील रुग्णसंख्या कमी करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. त्याच पद्धतीने इतर सामाजिक संघटनांनीदेखील वेळोवेळी सहकार्य करीत आहेत, अशी माहिती धरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.
पंधरा दिवसांत एकही रुग्ण तपासणीसाठी नाही
धरणगाव तालुक्यात एकूण ४ हजार ६५६ रुग्ण संख्या आढळून आलेली आहे, तर आज कोविड सेंटर येथे बरे झालेले ५ हजार ५८७, तर मृत ६५ रुग्ण धरणगाव तालुक्यात दिसून येतात.
गेल्या पंधरा दिवसांपासून धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात एकही रुग्ण कोविड तपासणीसाठी आलेला नाही. त्याच पद्धतीने धरणगाव नगर परिषदेने व ग्रामीण रुग्णालयाने ग्रामीण भागात जाऊन उपचार सुविधा पुरविणे, तपासणी करणे व रुग्णांना कशा पद्धतीने उपचार करता येतील, त्याचे मार्गदर्शन केले.
धरणगाव तालुका कोरोनामुक्त होत असून, रुग्णालयात जनरल रुग्णसेवा सुरू करण्यात आलेले आहे. तरीदेखील नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे.
-किरण पाटील, वैद्यकीय अधिकारी,
धरणगाव