हरताळे/इच्छापूर: मध्य प्रदेशातील प्रसिद्ध इच्छादेवी मंदिराच्या पूव्रेस तीन कि.मी. अंतरावर देव्हारी तलावाच्या पाझरत्या पाण्यावर येथील ग्रामस्थांनी खालच्या पाझरणा:या पाण्यावर पुन्हा बजरंगी पाझर तलाव स्व-मेहनतीने श्रमदान करीत उभारला असून परिसरातील सुमारे 150 हेक्टरवरील जमीन सिंचनाखाली आली आह़ेतलावाच्या भरावाची रुंदी 60 फूट तर उंची 30 फूट, लांबी सुमारे 200 फूट आहे. दोन ट्रॅक्टर व एक जेसीबीच्या माध्यमातून येथे गेल्या महिन्यापासून भराव टाकण्याच्या कामास प्रारंभ झाला आह़े काही अंतरावर असलेल्या देव्हारी तलावाचे पाझरणारे लाखो लीटर पाणी वाया जात होते. त्यावर गावक:यांनी शक्कल लढवित स्वयंप्रेरणेने योगदान देत या पाझर तलावाची उभारणी केली आहे. त्यामुळे उभारलेल्या तलावालगतच्या विहिरींची पाणी पातळी वाढलेली आहे. टय़ुबवेलचेही पाणी वाढल्याचा परिणाम या तलावाचा जाणवत आहे. त्यामुळे शेतक:यांच्या चेह:यावर चैतन्य निर्माण झाले आहे. या शेतक:यांनी घेतला पुढाकारगेल्या दोन वर्षापूर्वी वाया जाणा:या पाण्यासंदर्भात येथील शेतकरी तुकाराम महाराज भजनी मंडळ, ग्रामस्थ सुरेश वामन महाराज, अनिल धोंडू सपकाळ, साहेबराव कडू तायडे, नगिन बापूराव पंडित, सोपान सीताराम पंडित, श्रीराम वसंत तायडे, दादाराव रामभाऊ पंडित, सुधाकर सीताराम दाभाडे, बापू कडू पंडित, पंडित रामकृष्ण बोदडे, अरुण रमेश तांदुळलीकर, गणेश रमेश सपकाळ, दीपक कोंडे आदींनी ट्रॅक्टर, जेसीबी, डिङोलची रक्कम गोळा करून गावक:यांसह तलाव बांधला आहे. पाच वर्षापूर्वीचा तलावगेल्या पाच वर्षापूर्वी म.प्र. शासन जलधन संधान योजना भाग ब:हाणपूर अंतर्गत आमदार अर्चना चिटणीस व खासदार नंदकुमार सिंह चव्हाण यांनी सुमारे 669.24 लाख रुपये खर्चून देव्हारी तलाव बांधला होता. मात्र खाली पाझरणारे पाणी आवाक्याबाहेरचे असल्याने त्याच्याखाली दोन बांध टाकल्यानंतर देखील लाखो लीटर पाणी तापी नदीत वाहून वाया जात होते. त्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत बजरंग पाझर तलाव उभारला आह़े (वार्ताहर) पाणी टंचाईवर मात दरवर्षी येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. मात्र या पाझर तलावावर श्रमदानातून बांध टाकल्याने अडलेल्या पाण्यामुळे येथील पाणीटंचाई दूर होणार असल्याचे शेतक:यांनी सांगितले.परिसरातील सुमारे 15 ते 20 विहिरीची पाणी पातळीही वाढल्याने ग्रामस्थांनी केलेल्या या स्तुत्य श्रमदानाला प्रतिसाद मिळत आहे. इच्छा असेल तर मार्ग दिसेलचा प्रत्यय येथील शेतक:यांना आला असून श्रमदानातून तलाव बांध करणे हे एकीचे बळ असल्याचा प्रत्यय इच्छापूरकरांना आला आहे. श्रमदानातून नालाबांध मुख्य तलावाखाली दोन बांध बांधून देखील नाल्याचे पाणी वाया जाते त्याठिकाणी ग्रामस्थांनी नालाबांध टाकून श्रमदान केले आहे. म.प्र.शासन स्तरावरून येथील मुख्य तलावासाठी अनुदान मंजूर करून वाया जाणा:या पाण्याचे नियोजन व देव्हारी तलावाची पुन्हा दुरुस्ती करावी, अशी आशा व्यक्त केली जात आह़े विहिरींच्या जलपातळीत वाढ, सिंचन वाढले4श्रमदानातून उभारलेल्या बजरंगी पाझर तलावामुळे परिसरातील शेतक:यांच्या विहिरींच्या सिंचन पातळीत मोठी वाढ झाली आहे. शिवाय सुमारे 150 हेक्टर शेतीलादेखील त्याचा फायदा होणार असून उत्पन्नात मोठय़ा प्रमाणावर वाढ होणार आह़े
इच्छापूरकरांनी उभारला श्रमदानातून तलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2017 1:07 AM