याबाबत वाकचे सरपंच डॉ. नीळकंठ पाटील यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलिसांत १ ब्रास वाळू चोरून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. ३ रोजी सकाळी ३ वाजेच्या सुमारास वाक गाव ते पळसखेडा रोडवर नर्सरीसमोर ट्रॅक्टरचालक अक्षय परदेशी ऊर्फ जिभाऊ (रोकडा फार्म) याने राकेश सुधाकर पाटील ऊर्फ मिठ्या (वाक, ता. भडगाव) यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरमध्ये विनापास विनापरवानगी ३०३६ रुपये किमतीची १ ब्रास वाळू गौणखनिज चोरून वाहून घेऊन जात होते.
डॉ. नीळकंठ पाटील यांच्यासोबत असलेल्या गावाच्या वाळूविरोधी ग्राम दक्षता समिती सदस्यांनी वाळूचोरांना थांबवण्याचा प्रयत्न केला व ट्रॅक्टर भडगाव तहसील कार्यालयात जमा करण्यास सांगितले. मात्र, ट्रॅक्टरमालक राकेश पाटील याने ट्रॅक्टर लावण्यास नकार दिला. तसेच दम देत शिवीगाळ केली व चोरीने भरलेल्या वाळूचे ट्रॅक्टर ट्रॉलीसह घेऊन पळून गेला. याबाबत वाकचे सरपंच डॉ. नीळकंठ नरहर पाटील यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलिसात ट्रॅक्टरचालक व मालक दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तपास पोलीस नाईक पांडुरंग गोरबंजारा
करीत आहेत.