जळगाव : अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर आठ ते दहा दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातून पळवून नेला होता़ हाच ट्रॅक्टर जिल्हापेठ पोलिसांच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री २़३० वाजेच्या सुमारास हरिविठ्ठल नगरातून पकडला़ दरम्यान, ट्रक्टर पकडल्यानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला़अवैध वाळू वाहतूक करताना विना क्रमांकाचा ट्रॅक्टर महसुल विभागाच्या पथकाने पकडून तो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उभा केला होता़ परंतू, आठ ते दहा दिवसांपूर्वी कुणीतरी हा ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयातून पळवून नेला होता़याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती़ बुधवारी रात्री जिल्हापेठ पोलिसांना पळवून नेलेला ट्रॅक्टर हा हरिविठ्ठनगरात असल्याची माहिती मिळाली़त्या आधारावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक मनोज वाघमारे प्रशांत जाधव, अविनाश देवरे, नाना तायडे, उमेश पाटील आदींच्या पथकाने रात्री अडीच वाजता हरिविठ्ठलनगर गाठून ट्रॅक्टर पकडले़ ट्रॅक्टरचा चेचीस क्रमांक तपासला असता पळवून नेलेले ट्रॅक्टरच असल्याचे स्पष्ट झाले़ मात्र, यात चालक तेथून पसार झाला़ नंतर पोलिसांनी ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात जमा केले़याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़तो ट्रकही पोलिसांत जमातहसीलदार वैशाली हिंगे यांच्या पथकाने २५ जून रोजी अवैध वाळू वाहतूक करताना एम.एच.१९ झेड ४५४८ ताब्यात घेतला होता. नंतर हा ट्रक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात लावण्यात आला होता. परंतू हा ट्रक पळूवन नेण्यात आला होता. बुधवारी गुन्हा दाखल होताच गुरूवारी दुपारी हा ट्रक जिल्हापेठ पोलिसांनी पकडून जमा केला.
कलेक्टोरेटमधून पळवलेले ट्रॅक्टर मध्यरात्री पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 11:35 AM