शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

धक्कादायक : मुख्यमंत्र्यांना जळगाव आर.टी.ओ.कडून ट्रॅक्टरचा परवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 12:30 PM

देवेंद्र फडणवीस हे जामनेरचे तर नितीन गडकरी कोथळीचे रहिवासी

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांची बनावट सही व शिक्षण पदवीपर्यंत२००४ मध्ये काढलेला परवाना २०१८ मध्ये झाला उघड

विलास बारीजळगाव : पैसे दिल्यानंतर आरटीओ कार्यालयात कोणतीही कागदपत्रे तयार होतात असा प्रकार जळगाव आर.टी. ओ.कार्यालयात उघड झाला आहे. या कार्यालयातून चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने २००४ मध्ये ट्रॅक्टरचा परवाना तयार झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.दलालांनी (मध्यस्थ) पोखरलेल्या आर.टी.ओ.कार्यालयात पैसे दिल्यानंतर कोणतीही कागदपत्रे सहज तयार होत असल्याचा अनुभव अनेकांना आहे. तसेच काहीसे धक्कादायक कागदपत्रे समोर आले आहेत.या कार्यालयातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने वाहन चालविण्याचा परवाना तयार करण्यात आला आहे.उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील काही दलाल हे नियम आणि निकषांची अनेक वर्षांपासून वाट लावत आहे.काही वर्षांपूर्वी बनावट आधार कार्डच्या साहाय्याने सुरत येथील काही जणांना परवाना देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. तत्कालिन अधिकाऱ्यांनी ते वाहन परवाने रद्द केले होते. त्यातच आता मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय परिवहन मंत्री गडकरी यांना या कार्यालयाने अवजड वाहनासह ट्रॅक्टर चालविण्याचा परवाना वितरीत केल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. यावरून कार्यालयातील कागदपत्रे किती सुरक्षित आहेत याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.मुख्यमंत्र्यांची बनावट सही व शिक्षण पदवीपर्यंत...सुरुवातीच्या काळात आर.टी.ओ. कार्यालयामार्फत पुस्तक स्वरुपात वाहन चालविण्याच्या परवान्याचे वितरण करण्यात आले आहे. मात्र हा परवाना तयार करीत असताना नियमांची पायमल्ली होत आहे. तसाच काहीसा प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर वाहन परवाना क्रमांक २२३३/२००४ हा तयार करण्यात आला आहे. या परवान्यावर मुख्यमंत्र्यांची बनावट सही तयार केली आहे. त्यांच्या निवासाचा पत्ता बजरंगपुरा, जामनेर हा दाखविला आहे. त्यांचे शिक्षण पदवीपर्यंत तर रक्तगट ए-पॉझिटीव्ह दर्शविलेला आहे.२००४ मध्ये काढलेला परवाना २०१८ मध्ये झाला उघडमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जळगाव आर.टी.ओ.ने २०२४ पर्यंत वाहन परवाना दिला आहे. त्यात दुचाकी, अवजड वाहन आणि ट्रॅक्टरचा परवाना दिला आहे. या परवान्याच्या बदल्यात १८० रुपयांचे चलान देखील फाडण्यात आलेले आहे.केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना २०१८ पर्यंतचा परवानाकेंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने १२३४/२००४ या क्रमांकाने वाहन चालविण्याचा परवाना तयार केला आहे. २०१८ पर्यंत त्यांच्या परवान्याची मुदत असून त्यांना मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील रहिवासी दाखविण्यात आले आहे. या दोन्ही परवान्यांवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचा शिक्का तसेच डिजिटल सही आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने तयार केलेले बनावट वाहन परवाने २००४ मध्ये तयार झाले आहे. आता वाहन परवाना स्मार्ट कार्डच्या स्वरूपात दिला जातो. मी जून २०१६ मध्ये याठिकाणी रुजू झालो आहे. वाहन परवाना क्रमांक २२३३/२००४ व १२३४/२००४ हे दुसºया व्यक्तींच्या नावाने देण्यात आलेले आहेत. हा परवाना कार्यालयातून चोरी झाला असावा किंवा बनावट प्रिंट केला असावा. संपूर्ण रेकॉर्ड शोधून या प्रकरणाची चौकशी केली जाईल. तसेच संबधितावर गुन्हा दाखल करण्यात येईल.-जयंत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसJalgaonजळगाव