जळगाव- रनर्स असोसिएशनतर्फे रविवारी खान्देश मॅरेथॉन घेण्यात येणार आहे़ या मॅरेथॉन मार्गावरील वाहतुक ही पहाटे ५़३० ते ९़३० वाजेपर्यंत बंद करण्यात आली आहे.जळगाव रनर्स असोसिएशनतर्फे टाटा एआयजी आयोजित खान्देश मॅरेथॉन स्पर्धा ही रविवार, २४ नोव्हेंबर रोजी पहाटे ५़३० वाजता आयोजित करण्यात आली आहे़ सागरपार्क पासून मॅरेथॉनला सुरूवात होणार आहे़ त्यानंतर काव्यरत्नावली चौक, डी-मार्ट, मोहाडी रोड, लांडोरखोरी उद्यानपासून पुन्हा डी-मार्ट, काव्यरत्नावली चौक, महाबळ, संभाजी नगर त्यानंतर पुन्हा काव्यरत्नावी चौक मार्गे सागर पार्क येथे सकाळी ९ वाजता मॅरेथॉन समाप्त होणार आहे़ स्पर्धेसाठी व स्पर्धा पाहण्यासाठी सुमारे ८००० नागरिकांची उपस्थिती असणार आहे़ त्यामुळे मॅरेथॉन मार्गावर रहदारीचे नियम, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पहाटे ५़३० ते सकाळी ९ वाजेपर्यंत मॅरेथॉन मार्गावर वाहतुकीला प्रवेश बंद करण्यात आला आहे़ तसेच मॅरेथॉन मार्गाला जोडणारे गल्ली-बोळातील रस्तेही प्रवेशासाठी बंद करण्यात आले आहे़या मार्गाचा करावा वापरवाहतुकीसाठी प्रवेश बंद करण्यात आल्यामुळे स्पर्धेच्या वेळेपर्यंत नागरिकांनी आकाशवाणी, प्रभात चौक, मू़जे़ महाविद्यालय, रामानंदनगर, हरिविठ्ठलनगर मार्गे, गाडगेबाबा चौक, मोहाडी रोड या रस्त्यांचा पर्यायी रस्ता म्हणून वापर करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे़