ऑनलाईन लोकमत
अमळनेर, जि. जळगाव, दि. 16- पातोंडा येथे एस. टी. बसेस् न थांबल्याची तक्रार करण्यावरून वाद उद्भवल्याने वाहतूक नियंत्रकांना मारहाण झाल्याने अमळनेर येथे एस. टी. कर्मचा:यांनी सुमारे सव्वा तास चक्का जाम केला. दरम्यान, सरकारी कामात अडथळा आणला म्हणून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पातोंडा येथून दररोज अनेक विद्यार्थी अमळनेरला शाळेत ये जा करीत असतात. 16 रोजी सकाळी चोपडय़ाहून येणा:या दोन चोपडा-नाशिक बस न थांबल्याने प्रवाशांसह विद्यार्थी ताटकळले होते. तेथील एका तरुणाने आपण आगारात तक्रार करू म्हणून दुस:या बसने आल्यानंतर अमळनेरला येऊन वाहतूक नियंत्रकांच्या कॅबिनला आल्यावर कैफियत मांडून चोपडा आगराच्या वाहक व चालक विरुद्ध तोंडी तक्रार केली. त्यावेळी एक शालेय विद्यार्थी ओरडून तक्रार करू लागल्याने वादविवाद वाढले आणि काही वेळात एका विद्याथ्र्यांचे मामा तेथे आले. त्यांनी विचारपूस न करता वाहतूक नियंत्रक ब्रिजलाल बळीराम पाटील यांना कॅबिन मध्येच मारहाण केली. त्याचे पडसाद उमटले आणि एस टी कर्मचा:यांनी जागेवरच बसेस जैसे थे थांबवल्या. परिणामी बसेस रस्त्यावरच उभ्या राहून वाहतूक खेळंबली. काहींनी खाजगी वाहनाने जाणे पसंद केले. काही वेळात पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी दोन कर्मचा-यांसह आगार गाठले. ठिकाणी दोन जणांना ताब्यात घेऊन वाहतूक सुरू करण्याचे आवाहन केल्यानंतर सव्वा तासाने वाहतूक सुरळीत झाली. दरम्यान ब्रिजलाल पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून पैलाड येथील चेतन रमेश वाघ व संजय भगवान पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.